शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
3
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
4
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
5
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
6
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
7
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
8
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
9
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
10
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
11
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
12
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
13
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
14
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
15
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
16
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
17
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
18
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
19
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
20
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

coronavirus: अंबरनाथसाठी निधीपेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांची गरज, प्रशासनाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:36 IST

अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यानंतरही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारकडून डॉक्टर आणि वैद्यकीय सहायकाची गरज आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. पालिकेला निधीपेक्षा डॉक्टरांची सर्वाधिक गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही. पालिकेने कंत्राटी पद्धतीने जे डॉक्टर घेतले आहेत, त्यांच्या भरवशावर कोविड रुग्णालय सुरू ठेवले आहे. मात्र या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. अशा कठीण परिस्थितीत रूग्णालयातील ताण कमी करण्यासाठी रुग्णांना तीन ते चार दिवसात घरी सोडण्यात येत आहे. रुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडू नये त्यामुळेच पालिका प्रशासन असे निर्णय घेत आहे. राज्य सरकारमार्फत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र निधीपेक्षा सरकारने तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांना मदत करणारी टीम द्यावी अशी माफक अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर अंबरनाथमध्ये वर्ग करावे अशी सूचनाही पुढे करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यात कोरोनाग्रस्त आणि त्यांचे निकटवर्तीय यांना शोधण्यात आणि त्यांच्याशी संपर्कात राहण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे पालिकेच्या नियंत्रण कक्षातून रुग्णांना सतत दक्षता घेण्याचे सल्ले दिले जात आहे.प्रशासन उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत असल्याने त्यात अडचणी येत आहेत. सरकारकडे आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांची मागणी केली आहे. तसेच वैद्यकीय सेवकही गरजेचे आहेत.- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथthaneठाणे