शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अंबरनाथ 'कोरोना'मुक्त शहर, तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 20:41 IST

CoronaVirus : अंबरनाथ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण हा बुवापाडा भागात सापडला होता. मात्र त्या रुग्णाचा उपचारादरम्यान 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला.

अंबरनाथ  : अंबरनाथ शहरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. तर इतर 3 रुग्णांवर उपचार सुरु होते. या उपचार घेणा-या तिन्ही रुग्णांचे कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे या तिन्ही रुग्णांना रुग्णालयात सोडण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे आले आहे.

अंबरनाथ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण हा बुवापाडा भागात सापडला होता. मात्र त्या रुग्णाचा उपचारादरम्यान 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला. मात्र त्याच्या संपर्कात आलेले त्याचे दोन पुतणे हे देखील कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांना देखील उपचारासाठी ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन रुग्णांवर उपचार सुरु असतांनाच मुंबईत काम करणा-या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली होती. त्याला मुंबईहुनच रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे अंबरनाथमध्ये तीन कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत होते. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या नातेवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्या 35 कुटुंबियांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले होते. तर डायलेसिस साठी गेलेल्या एका रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबियांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्या तीघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील सर्व 38 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. त्यातच आता उपचार घेणारे तिन्ही रुग्ण देखील कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आता अंबरनाथ शहर ते कारोना रुग्ण मुक्त शहराच्या यादीत आले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार आणि कारोनासाठी नेमलेले डॉ. मेजर. नितीन राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. शहर कारोना रुग्ण मुक्त झाले असले तरी शहराच्या सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात नागरिक बाहेर पडणार नाही आणि जे विणाकारण फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच शहरातुन बाहेर अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी जात आहेत त्यांची माहिती घेऊन त्या कर्मचा-यांना सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसेच शहरात येणा-या प्रत्येक गाडय़ाचे निर्जतुकीकरण केले जात असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथ