शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अत्यावश्यक सेवा वगळता ठाण्यात इतर सेवा पूर्ण बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 02:16 IST

टोल नाक्यावर वाहनांची रांग; सरकारी आदेशातील संदिग्धतेमुळे उद्योगांचे शटर डाउन

ठाणे : ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा या बंदच होत्या. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने व उद्योग सुरु करण्याबाबतच्या सरकारी आदेशांत संदिग्धता असल्याने काही आस्थापनांना व्यवहार सुरु करण्याची परवानगी देऊनही बहुतांश व्यवहार ठप्पच होते.मागील २१ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आला आहे. तो आता ३ मे पर्यंत लागू असणार आहे. २० एप्रिल पर्यंत ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल त्या ठिकाणचे उद्योग तसेच इतर काही व्यवहार काही प्रमाणात सुरु करता येऊ शकतील, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. तसेच शासकीय कार्यालयात १० टक्के उपस्थितीला परवानगी दिली होती. परंतु ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १५० च्या घरात गेला आहे. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील एकही उद्योगधंदा सोमवारपासून सुरु होऊ शकलेला नाही. उद्योग सुरु केल्यानंतर कामगारांना त्याच ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी अट घालण्यात आली आहे. परंतु लघु उद्योगांसाठी ते शक्य नाही. उद्योग सुरु केले तरी कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे उद्योगधंदे सुरु करुन काय उपयोग, असा सवाल ‘टिसा’चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब खांबेटे यांनी केला. तसेच सरकारच्या इतर अनेक अटी जाचक आणि संदिग्ध असल्याने जिल्ह्यातील उद्योगधंदे सुरु होऊ शकलेले नाहीत, असे खांबेटे म्हणाले.टोलनाकेसोमवारपासून सुरु झाल्याने आनंद नगर टोलनाक्यावरील दोन लेन यासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी अवजड वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्या होत्या. महापालिकेतही १० टक्के कर्मचारी हजर नव्हते. कर्मचाऱ्यांचे प्रमाण तुरळक होते. शहरातील इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंदच होत्या.कळव्यात भाजीसाठी गर्दीमहापालिकेत १० टक्के कर्मचाºयांची उपस्थिती मंजूर केलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. ठाण्यातील दैनंदिन व्यवहारांवर कोरोनाच्या भयाचे सावट असले तरी कळव्यात मात्र रुग्ण वाढत असतांनाही नागरीकांना त्याचे भय नसल्याचे चित्र होते. रस्त्यांवर तसेच भाजी खरेदीकरिता लोकांची गर्दी दिसत होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस