शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

Coronavirus: भिवंडीतील ९0 वर्षीय आजीबाईंची कोरोनावर मात; एकाच दिवशी १६ रुग्णांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:37 IST

बदलापूरची दोन कुटुंबेही झाली बरी

ठाणे : सहा महिन्यांच्या चिमुरड्यापाठोपाठ भिवंडीतील ९0 वर्षीय वृद्धेनेही कोरोनावर मात केली आहे. याशिवाय बदलापुरातील दहा जणांच्या दोन कुटुंबांसह एकूण १६ रुग्ण मंगळवारी कोरोनावर विजय मिळवून घरी परतले आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून घरी जाताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. वयाच्या नव्वदीत कोरोनाला पराभूत करणारी भिवंडीची महिला वयोवृद्ध रुग्णांमध्ये पहिली ठरली आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयात एक ते दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांवर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रसाद भंडारी आणि इतर डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. उपचाराला प्रतिसाद देत शनिवारी नऊ रुग्ण घरी परतले. यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश होता. आता कोरोनाला हरवून मंगळवारी आणखी १६ जण घरी परतले. यामध्ये बदलापुरातील दोन कुटुंबांतील दहा जण असून सहा जण १0 वर्षांखालील मुले आहेत. त्याचबरोबर वसई-विरार येथील दोघे, एक ठामपा कर्मचारी आणि भिवंडीतील तिघे जण असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.आजीबार्इंनी केले समाधान व्यक्तभिवंडीच्या आजीबार्इंना त्यांच्या मुलांमुळे संसर्ग झाला होता. त्यांना त्यांच्या दोन मुलांसह ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात २२ एप्रिलला दाखल केले होते. उपचारानंतर आजीबार्इंची टेस्ट निगेटिव्ह आली; मात्र मुलांची टेस्ट अद्यापही निगेटिव्ह आलेली नाही. त्यामुळे आजीबार्इंना घरी सोडले असून मुले अद्याप उपचार घेत आहेत. आजीबार्इंनी रुग्णालयातील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.पॉझिटिव्ह आईसोबत राहून तान्हुली निगेटिव्हचबदलापूर येथील दोन कुटुंबांतील दहा जण पॉझिटिव्ह असल्याने उपचारार्थ दाखल झाले होते. त्यांची मुले १0 वर्र्षांखालील होती. एका कुटुंबातील सहा महिन्यांची तान्हुली निगेटिव्ह, तर तिची आई पॉझिटिव्ह होती. मात्र, तान्हुली शेवटपर्यंत निगेटिव्ह होती. कोरोनाच्या तीन टेस्ट केल्यानंतर तिचे अहवाल निगेटिव्हच आले. दोन्ही कुटुंबे मंगळवारी घरी परतल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या