शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Coronavirus : आदिवासी आश्रमशाळांमधील ८५ हजार विद्यार्थ्यांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 2:39 AM

जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आदिवासी विकास विभाग येथील अप्पर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणातील महाविद्यालये, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वसतिगृह (होस्टेल), आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या नामांकित आणि एकलव्य आदी २३७ शाळा, तसेच वसतिगृहांमधील ८५ हजार ८३४ विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहेत. परीक्षा सुरू असल्यामुळे केवळ दहावी, बारावीचे सात हजार १८० विद्यार्थी आश्रमशाळा, वसतिगृहांत वास्तव्याला आहेत.जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आदिवासी विकास विभागाच्या येथील अप्पर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात शहापूर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, रायगड जिल्ह्यातील पेण, पुणे जिल्ह्यातील घोडेगाव आणि सोलापूर आदी सहा प्रकल्प कार्यालये आहेत. यामध्ये २३७ आश्रमशाळा, वसतिगृह, अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्यापैकी आश्रमशाळा व वसतिगृहातील दहावी- बारावीचे सात हजार १८० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. उर्वरित ८५ हजार ८३४ विद्यार्थ्यांची घरवापसी करण्यात आलेली आहे.शहापूर प्रकल्पाच्या नियंत्रणातील २३ आश्रमशाळांमध्ये केवळ ८०२ दहावीचे विद्यार्थी आहेत. उर्वरित ८,८१७ विद्यार्थ्यांना घरी पाठवून देण्यात आले आहे. दहा वसतिगृहामधील ७१४ विद्यार्थ्यांचीही घरी रवानगी करण्यात आली आहे. १३ अनुदानित आश्रमशाळांमध्ये ४७८ विद्यार्थी आहेत. उर्वरित चार हजार ७०९ विद्यार्थी घरी गेले आहेत. शेंडे येथील एकलव्य शाळेतील २०५ विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. याशिवाय जव्हारच्या ३० आश्रमशाळांच्या १७ हजार ७४५ पैकी केवळ एक हजार ९७० विद्यार्थी शाळेत आहेत. अनुदानित आश्रमशाळेतील ११ हजार ७६० पैकी केवळ ७६५ विद्यार्थी वास्तव्याला आहेत. १६ वसतिगृहातील एक हजार ४३६ विद्यार्थ्यांपैकी केवळ १६ विद्यार्थी वसतिगृहात असून, उर्वरित घरी पाठवण्यात आलेले आहेत.रायगडच्या पेण प्रकल्पामधील १४ आश्रमशाळांच्या पाच हजार ३१३ पैकी ३५९ विद्यार्थी शाळेत आहेत. १२ वसतिगृहांमधील एक हजार २३७ पैकी ३७ विद्यार्थी वसतिगृहांत आहेत. नामांकित शाळा पाच असून, त्यातील दोन हजार १२८ पैकी ९४ विद्यार्थी शाळेत आहेत. या प्रकल्पातील दहा अनुदानित शाळांमध्ये चार हजार ४८६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३९७ विद्यार्थी आहेत. घोडगावच्या नऊ आश्रमशाळांच्या दोन हजार ९३१ पैकी केवळ ३०८ विद्यार्थी आहेत. २४ वसतिगृह, २३ आश्रमशाळा, १८ नामांकित शाळांचे विद्यार्थी घरी गेले आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस