शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मुंब्य्राभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, चार दिवसांत ५२ रुग्ण, बेफिकीर वृत्ती कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:21 IST

गेल्या चार दिवसांत आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील आहेत. मंगळवारी येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२९ वर पोहोचली होती. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- कुमार बडदेमुंब्रा : ठामपाच्या इतर काही प्रभाग समित्यांप्रमाणे मुंब्रा प्रभाग समितीमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. मागील चार दिवसांमध्ये येथील विविध भागांत कोरोनाचे ५२ नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या चार दिवसांत आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील आहेत. मंगळवारी येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२९ वर पोहोचली होती. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ८८ जणांवर उपचार सुरु आहेत. येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच येथील नागरिकांची बेफिकीर वृत्ती कमी झालेली नाही. रुग्ण वाढू नयेत, यासाठी ठामपा तसेच पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु, बहुतांश भागातील नागरिक आम्हाला कोरोनाची लागण होऊच शकत नसल्याच्या आविर्भावात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काही ठिकाणी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना अटकाव करण्याचा पोलीस त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.पोलिसांचे आवाहनकोरोनाचा सामुदायिक प्रसार होऊ नये, यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही भान ठेवून घराबाहेर न पडण्याचा निश्चय करून स्वत:चा तसेच त्यांच्या कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे