शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

coronavirus: ४८ तासांमध्ये ५० पोलिसांना झाला कोरोना, आठ पोलिसांवर घरीच सुरु आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 12:44 AM

अवघ्या ४८ तासांमध्ये चार अधिकाऱ्यांसह ५० पोलीस कोरानामुळे बाधित झाले. आतापर्यंत ६३ अधिका-यांसह ६४३ पोलीस बाधित झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ​​​​​​​

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे एकीकडे बंदोबस्त करायचा की, कोरोनाशी लढा द्यायचा, अशी परिस्थिती पोलिसांमध्ये आहे. गेल्या अवघ्या ४८ तासांमध्ये चार अधिकाऱ्यांसह ५० पोलीस कोरानामुळे बाधित झाले. आतापर्यंत ६३ अधिकाºयांसह ६४३ पोलीस बाधित झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.आतापर्यंत कोरोनामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका महिला कर्मचाºयासह चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्हाभरात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी चितळसर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला. त्याचवेळी संपूर्ण आयुक्तालयात तीन अधिकारी आणि २३ कर्मचारी अशा २६ पोलिसांना ४ जुलै रोजी लागण झाली. यामध्ये चितळसरच्या चौघांचा समावेश आहे. तर कासारवडवलीतील एका उपनिरीक्षकासह तिघेजण बाधित झाले. बºयाच दिवसांच्या अंतराने वर्तकनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकालाही बाधा झाली. याशिवाय, वागळे इस्टेट, शांतीनगर, टिळकनगर, विशेष शाखा, उल्हासनगर नियंत्रण कक्ष, कोळसेवाडी, निजामपुरा, नौपाडा आणि डायघर आदी पोलीस ठाण्यांमधील कर्मचाºयांचाही यात समावेश आहे. गेल्या ४८ तासांमध्ये ५० पोलीस बाधित झाले असून या सर्वांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.वेळेत उपचार केल्याने ४२१ जणांनी केली मातआतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ६३ अधिकारी आणि ५८० कर्मचारी असे तब्बल ६४३ पोलीस बाधित झाले आहेत. सुदैवाने वेळीच उपचार घेऊन मनोधैर्य खचू न दिल्याने ४४ अधिकारी तसेच ३७७ कर्मचारी अशा ४२१ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४६ कर्मचाºयांना घरी तर दोघांना केंद्रामध्ये क्वारंटाइन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेPoliceपोलिस