शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: चिंता वाढली : बदलापुरात तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 03:11 IST

coronavirus in Badlapur : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत.  अशातच ही नवी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.

- पंकज पाटील अंबरनाथ : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत.  अशातच ही नवी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे समस्त पालकवर्गाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाणही वाढले आहे.कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जात आहेत. कारण, या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणेही दिसत आहेत.  ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्या ही या नव्या कोरोनाची लक्षणे आहेत. हीच लक्षणे मुलांसाठी घातक ठरत आहेत. यापूर्वीही मुलांना कोरोनाची लागण होत होती. मात्र, मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा जास्त असल्याने मुले लवकर बरी होत होती. मात्र, नव्या कोरोनामध्ये होत असलेले जुलाब, उलट्या हे त्रास मुलांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे.  अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या पाहता बदलापूर शहरात मागील तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शून्य ते ५ वयोगटातील ८८, ६ ते १० वयोगटातील ९६, ११ ते १५ वयोगटातील ११३, तर १६ ते २० वयोगटातील १०४ लहान मुलांचा समावेश आहे.  अंबरनाथ शहरात  २१५ जणांना लागण अंबरनाथमध्येही मागील दोन महिन्यांत २१५ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ० ते ५ वयोगटातील २२, ६ ते १० वयोगटातील ४४, ११ ते १५ वयोगटातील ६२, १६ ते २० वयोगटातील ८७ लहान मुलांचा समावेश आहे. या नव्या संख्येमुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार असली, तरी मुलांची काळजी घेणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूरambernathअंबरनाथ