शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

Coronavirus: ३९ पोलिसांना कोरोनाची लागण; दोन अधिकाऱ्यांचा समावेश, सात जणांवर घरीच उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 02:37 IST

पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये झोकून देऊन योगदान दिले आहे. यातूनच अनेकजण बाधित झाल्यानंतर पोलिसांची तपासणी सुरू केली.

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात बुधवारी एकाच दिवसात दोन उपनिरीक्षकांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. यामध्ये मुख्यालयातील सर्वाधिक १३ पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच एकाचवेळी ३९ पोलीस बाधित झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे एका आयपीएस अधिकारी महिलेची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे ठाणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ जून रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे आणि राज्य राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाली. या दोघांनाही भार्इंदरपाडा येथील उपचार केंद्रात दाखल केले आहे. तर मुख्यालयातील सात महिलांसह १३ पोलीस कर्मचाऱ्यांनाही लागण झाली. या सर्वांवर भिवंडी, शहापूर आणि नवी मुंबई अशा वेगवेगळ्या रुग्णालयांध्ये उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त मोटार परिवहन विभागातील सहा चालक तसेच राज्य राखीव पोलीस दलातील पाच जवानही बाधित झाले आहेत.

तसेच राबोडी, भिवंडी नियंत्रण कक्ष आणि बदलापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोघे बाधित झाले आहेत. याशिवाय, कळवा, कोनगाव, मानपाडा, मध्यवर्ती, उल्हासनगर आणि कापूरबावडी येथील प्रत्येकी एका कर्मचाºयाला लागण झाली आहे. यातील काही पोलिसांचे कुटूंबीय देखील बाधित झाल्यामुळे चिंतेमध्ये आणखीनच भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सौम्य किंवा अजिबात लक्षणे नसणाºया पोलिसांवर घरीच उपचाराचा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे. त्यानुसार राबोडी, कळवा आणि उल्हासनगर येथील सात पोलिसांवर घरी उपचार करण्यात येत आहेत, असे सांगण्यात आले.पोलीस उपायुक्तांनी केली कोरोनावर मातपोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने २६ जूनपासून आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाºयांची मोफत आरोग्यतपासणी सुरू केली आहे. अशा नऊ हजार पोलिसांची तपासणी होणार आहे. सौम्य लक्षणे असणाºया १०० पेक्षा अधिक पोलिसांची आतापर्यंत तपासणी झाली. यामध्ये एका आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस उपायुक्तांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर, अवघ्या पाचच दिवसांमध्ये मुंबईमध्ये केलेल्या तपासणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अर्थात, तरीही या महिला अधिकाºयांना १४ दिवसांसाठी गर्दीत न मिसळण्याबरोबर विश्रांती घेण्याचाही सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये झोकून देऊन योगदान दिले आहे. यातूनच अनेकजण बाधित झाल्यानंतर पोलिसांची तपासणी सुरू केली. पूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांच्या संपर्कातील हायरिस्कमधील पोलिसांना क्वारंटाइन केले होते. त्यातील काही आता बाधित झाले. आवश्यक ते उपचार करून लवकरच पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आणू, असा विश्वास आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिकांनी लॉकडाऊनला गुरुवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अशी साथ मिळाली तर लवकरच कोरोनाची साखळी तोडता येईल. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहरआतापर्यंत ५९ अधिकाºयांसह ४९९ कर्मचारी अशा ५५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ३५ अधिकारी आणि ३३४ कर्मचारी अशा ३६९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर, तिघांचा यामध्ये मृत्यू ओढवला आहे. सध्या ५८ पोलिसांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर, दोघांना केंद्रामध्ये क्वारंटाइन केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस