शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आश्रमशाळेतील ३७ मुले अन् १६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; जव्हारमधील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 21:28 IST

काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाचे विनवळ आश्रमशाळेतील श्रीशक्ति संस्थेचे सेंट्रल किचन येथील 16 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

हुसेन मेमन 

जव्हार - तालुक्यातील कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढत असून आश्रमशाळेतील 37 मुले तर त्याच शाळेतील 3 शिक्षक व  आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सेंट्रल किचनचे 16  कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर नगर परिषद हद्दीतील 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्यामुळे जव्हार तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाचे विनवळ आश्रमशाळेतील श्रीशक्ति संस्थेचे सेंट्रल किचन येथील 16 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काही रूग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा या कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे. तर तीन चार दिवसांपूर्वी हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील ई. 10 ते 12 वर्गात शिक्षण घेत असलेले 9 विद्यार्थी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथे तपासणी साठी आणण्यात आले होते, एकाच शाळेतील 9 विद्यार्थ्यांना एकाच वेळी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने, डॉक्टरांना संशय आला, त्यांची तेथे अँटिजेन तपासणी केली असता नऊचे नऊ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले.

हे धक्कादायक वास्तव समोर आल्यावर तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील 28 विद्यार्थी पॉझिटिव्ह तर 3 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले, असे हिरडपाडा शाळेतील एकूण 37 विद्यार्थी व 3 कर्मचारी असे 40 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आश्रमशाळेतील  विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे असून, त्यांना जव्हारच्या मुलींचे वसतिगृह येथील सी. सी. सी. सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहेत.  तसेच आजपर्यंत 72 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले असून, जव्हार येथील कोविड सेंटरही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, लग्न समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकवा जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. - डॉ. किरण पाटील, जव्हार तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस