शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1353 रुग्णांची नोंद, तर 35 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 19:54 IST

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी देखील घट झाल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बराशेवर स्थिरावलेली असतानाच,  बुधवारी दिवसभरात 1353 रुग्णांची तर, 35  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख 9 हजार 885 तर, मृतांची संख्या आता तीन हजार 142 झाली आहे.  ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी देखील घट झाल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 325 रुग्णांची तर, 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 21 हजार 798  तर, मृतांची संख्या 520 वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 361 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 25 हजार 231 तर, मृतांची संख्या 520 वर गेली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 21 बाधितांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 23 हजार 843 तर, मृतांची संख्या 764  वर गेली आहे. मीरा भाईंदरमध्ये 115 रुग्णांची तर, 5  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 11 हजार 104 तर, मृतांची संख्या 374  इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 82 बधीतांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 18 तर, मृतांची संख्या 278 झाली. तसेच उल्हासनगर 34 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 433 तर, मृतांची संख्या 196 झाली आहे. अंबरनाथमध्ये 26 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 546 तर, मृतांची संख्या 175 झाली. बदलापूरमध्ये 63 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 603 इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 136 रुग्णांची तर, 1 मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 8 हजार 275 तर, मृतांची संख्या 253 वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे