शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

अखेर ठाण्यातील पोलिसांवर होणार आता कोरोनाचे कॅशलेस उपचार

By जितेंद्र कालेकर | Updated: May 7, 2020 01:10 IST

कोविड रुग्णालयांचा महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश नसल्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील कोरोनाग्रस्त पोलिसांना लाखोंची बिले भरावी लागत होती. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची आता राज्य शासनाने दखल घेतली असून ठाण्यातील होरायझन आणि सफायर या दोन कोविड रुग्णालयांसह राज्यभरातील अशा अनेक रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश केल्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांवर कॅशलेस उपचार होणार आहेत.

ठळक मुद्देलोकमत इफेक्टवेदांतसह होरायझन आणि सफायर रुग्णालयातही होणार पोलीस कुटूंब आरोग्य योजनेतून मोफत उपचार

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणो: ठाणे शहरातील वेदांत या रु ग्णालयासह आता कळव्यातील सफायर आणि घोडबंदर रोडवरील होरायझन या कोविड रु ग्णालयांचाही समावेश राज्य शासनाने पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये केला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांवर या रुग्णालयातही अगदी कॅशलेस उपचार होणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. या आजाराचा या योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे ठाण्यासह राज्यातील पोलिसांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.ठाण्यासह राज्यातील अनेक कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी रु ग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत राज्य शासनाने समावेश केलेला नव्हता. त्यामुळे कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराशी लढा दिल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेक पोलिसांच्या हातात लाखोंची बिले येत असल्याचे सविस्तर वृत्त ‘कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचाराची लाखोंची बिले, पोलीस कुटूंब आरोग्य योजना: कोविड रुग्णालयांचा समावेशच नाही’, या मथळयाखाली ‘लोकमत’च्या २ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. राज्य शासनाने कोविड रुग्णालयांचाही पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली होती. जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गापासून जगाला संरक्षण देणा-या आरोग्य तसेच पोलीस सेवेतील देवदूतांचे सध्या एका बाजूला कौतुक होत असतांना दुसरीकडे ठाण्यासह राज्यभरात अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यात ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ५ अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतही कोरोनाची लागण झाल्यामुळे तीन पोलिसांचा मृत्यु झाला. दरम्यान, ठाण्यात कळवा येथील सफायर या खासगी रु ग्णालयातून अलिकडेच कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परतलेल्या पोलीस कर्मचा-याला एक लाखांचे बिल भरावे लागले. त्याच्यासह अन्यही अनेकांना अशाच बिलांचा भरणा करावा लागला. यात मेडिक्लेमही लागू नसल्याचे या पोलिसांना सांगण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असून कोरोना या आजाराचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश केला आहे. तसेच ‘सफायर’ आणि ‘होरायझन’ या दोन कोविड रु ग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश करण्याच्या ठाणे शहर पोलिसांच्या प्रस्तावालाही हिरवा कंदिल दिला आहे. राज्यातील अशा अनेक खासगी रु ग्णालयाच्या मागणीलाही गृहविभागासह आरोग्य मंत्रालयाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या विरोधात दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा-या पोलिसांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात कल्याण डोंबिवलीतील आर. आर. आणि  न्यूऑन या रुग्णालयांचा देखिल समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्शील असणाºया पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यावर मात्र लाखोंच्या बिलांचा भरणा करावा लागत होता. हे खरे आहे. पण आता ठाण्यातील सफायर आणि होरायझन या कोविड रु ग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत शासनाने समावेश केला आहे. त्यामुळे आधी ज्यांनी बिले भरली त्यांनाही बिले सादर केल्यावर त्याची भरपाई मिळेल. शिवाय, यापुढेही पोलिसांना कॅशलेस सुविधा मिळणार आहे.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर 

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस