शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

२४० दिवसांनंतर कोरोनायोद्धाची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 01:18 IST

CoronaVirus News : कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरल्यावर ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी नाकती यांनी निःस्वार्थ सेवा देण्यास सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घरापासून दूर राहून ‘वुई आर फॉर यू’च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या किरण नाकती या कोरोनायोद्धाची २४० दिवसांनी घरवापसी झाली. कोरोनाग्रस्तांचा, त्यांच्या नातेवाइकांचा आधारवड बनलेला हा योद्धा ठाणेकरांना विविध प्रकारच्या १५ सेवा देत असून त्या निरंतर सुरू ठेवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर पसरल्यावर ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी नाकती यांनी निःस्वार्थ सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मास्कवाटप केले. २१ मार्चपासून त्यांनी वुई आर फॉर यूच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिवसरात्र सेवा देण्याचा विडा उचलला. जसजशा गरजा लक्षात आल्या, तसतशी त्यांच्या सेवेमध्ये भर पडत गेली. घरपोच किराणा देणे, आपत्कालीन परिस्थितीत मोफत रिक्षासेवा, ज्येष्ठ नागरिकांना टिफिनसेवा, ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना मोफत जेवणाचे डबे पोहोचविणे, घरपोच भाजीपाला, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास तो परिसर मोफत निर्जंतुकीकरण करून देणे, घरपोच औषध पोहोचविणे अशा १५ सेवा त्यांनी ठाणेकर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना देण्यास सुरुवात केली.

कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त आढळल्यास त्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून कोरोना समुपदेशन त्यांनी सुरू केले. रुग्णांना दाखल करून देण्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी समन्वयकाचीही भूमिका निभावली. ही सेवा करण्यासाठी ते आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहिले आणि बघताबघता २४० दिवस झाले. 

सेवा राहणार निरंतरnदिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल आठ महिन्यांनी किरण नाकती यांनी घरवापसी केली. त्यांना घरी परतल्याचे पाहून त्यांची आई, पत्नी संध्या नाकती, मुले आदित्य आणि अथर्व यांनी आनंद व्यक्त केला. nघरापासून दूर राहून ठाणेकरांची कुटुंबाप्रमाणे काळजी करणारे नाकती म्हणजे खरा कोरोनायोद्धा अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. नाकती हे घरी परतले असले, तरी त्यांची ठाणेकरांसाठी करत असलेली सेवा निरंतर सुरूच राहणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस