शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचं आंदोलन; मनसेसोबत पायऱ्यांवर 'ठिय्या', अधिकाऱ्यांवर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 17:23 IST

Corona Virus : ठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे, पार्कीग प्लाझा येथील कोवीड सेंटरला देखील ऑक्सीजनचा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही.

ठळक मुद्देठाणे  महापालिका हद्दीत रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे, पार्कीग प्लाझा येथील कोवीड सेंटरला देखील ऑक्सीजनचा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही

ठाणे : रुग्णांच्या नातेवाईंकाना बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, ऑक्सीजनचा तुटवडा, रेमडेसिवरचा तुटवडा आदींमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन आणि रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑक्सीजनच्या बाटल्याच पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या दरवाजाबाहेर ठेवल्या होत्या. या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तब्बल दोन तास हे आंदोलन सुरु असल्याचे दिसून आले.           ठाणे  महापालिका हद्दीत रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे, पार्कीग प्लाझा येथील कोवीड सेंटरला देखील ऑक्सीजनचा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही. रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन सह रेमडेसिवरचा साठा उपलब्ध व्हावा या मागणीसाठी मंगळवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋुता आव्हाड यांच्या पत्नीने महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याचे दिसून आले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अशरफ शाणु पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे  महापालिका मुख्यालयातच ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऋुता आव्हाड यांची समजूत  काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पालिका अधिकाऱ्यांवर त्या चांगल्याच संतापल्याचे दिसून आले.

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच ठाणेकरांवर ही वेळ आली असल्याचे आरोप यावेळी आंदोलनकत्र्यानी केला. जोपर्यंत आयुक्त स्वत: येऊन यासंदर्भात काही माहिती देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ठाणो महापालिकेचे उपयुक्त संदीप माळवी यांनी आंदोलन सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्न ऋुता आव्हाड आणि शानू पठाण हे आंदोलनच्या भूमिकेवर ठाम राहिले.

ऑक्सिजन आणि रेमडेसिवरचा पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून महाविकास आघाडीतच गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीलाच अशा प्रकारे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. गृहनिर्माण मंत्र्यांची पत्नी असले तरी मी अनेक सामाजिक संस्थाशी जोडले गेले असून सामान्य जनतेशी आंदोलन करणो माझे  कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

मनसेने घेतली आयुकांची भेट  या आंदोलनात सहभागी झालेले मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची भेट घेतली. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. तर मुख्यालयाखाली ऋुता आव्हाड आणि शानू पठाण यांचे आंदोलन सुरूच होते.

मनसे असेल तर सहभागी होणार नाहीया आंदोलनच्या दरम्यान राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे त्या ठिकाणी आले. स्वत: ऋता आव्हाड हे आंदोलनाला बसल्या असताना मुल्ला हे त्या ठिकाणी थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र, मनसेचे अविनाश जाधव हे आंदोलनात असल्याने मनसे असेल तर आंदोलनात सहभागी होणार नाही असे स्पष्ट करत ते थेट तिथून  निघून गेले. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस