शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News: कोरोनामुळे ठाणे पोलीस दलातील जमादार सुखदेव पाटील यांचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 22:13 IST

कोरोनाची बाधा झाल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुखदेव पाटील (५७) यांचा मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. त्यांच्या मागे पत्नी ज्योती (५५) तसेच मुलगा अनुराग आणि मुलगी (दोन्ही मुले विवाहित) असा परिवार आहे.

ठळक मुद्देउपचारादरम्यान १६ दिवसातच संपली कोरोनाशी झूंज आतापर्यंत ३६ पोलीस शहीद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाची बाधा झाल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुखदेव पाटील (५७) यांचा मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कोरोनामुळे ३६ पोलीस शहीद झाले असून यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.पाटील यांना १० एप्रिल २०२१ रोजी घसा खवखवणे, ताप आणि सर्दी चा त्रास झाल्याने त्यांची कोविडची तपासणी केली होती. ती १२ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आली. सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांनी घरी काही दिवस उपचार केले. अधिक त्रास झाल्यामुळे त्यांना १७ एप्रिल रोजी वर्तकनगर येथील लाईफकेअर हॉस्पीटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतांनाच २७ एप्रिल रोजी सकाळी त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉ. राजेश विश्वकर्मा यांनी सांगितले. पाटील हे ठाणे शहर पोलीस दलात १९ नोव्हेंबर १९८३ रोजी भरती झाले होते. ते १० जून २०१० पासून वर्तकनगर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि उपायुक्त विनय राठोड यांच्यासह वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, संतोष घाटेकर तसेच कर्मचाऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.* आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २७० अधिकारी आणि एक हजार ९९६ अंमलदार कोरोनामुळे बाधित झाले. यामध्ये दोन अधिकाºयांसह २६ पोलिसांचा मृत्यु झाला आहे.* एक महिन्यांनी होणार होते निवृत्त पाटील हे ३८ वर्षांच्या पोलीस सेवेनंतर पुढील महिन्यातच ३१ मे २०२१ रोजी निवृत्त होणार होते. त्यांच्या मागे पत्नी ज्योती (५५) तसेच मुलगा अनुराग आणि मुलगी (दोन्ही मुले विवाहित) असा परिवार आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू