शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

जिल्ह्यात 11 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:25 PM

लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू : ४४ केंद्रांवर प्रशासनाचे नियोजन

सुरेश लोखंडे ठाणे : कोरोना या जागतिक महामारीतून बचाव करण्यासाठी आरोग्ययंत्रणेसह पोलीस आणि प्रशासनाच्या या फ्रन्टलाइन वर्कर पाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिकांनाही एक मार्चपासून कोरोना लसी देण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ४०८ ज्येष्ठ नागरिकांना ४४ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी व त्याविरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने राज्यभरात ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ या दोन प्रकारच्या लसींना मान्यता दिली आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या लसीचा डोस जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे फ्रन्टिअर अधिकारी, कर्मचाऱ्यांपाठोपाठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि तिसऱ्या टप्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांकडून या लसीकरणाचे काम सुरू आहे.

तिसऱ्या टप्प्यातील या लसीकरणापाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ४०८ ज्येष्ठांना या लसीकरणाचा लाभ देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिकांसह दोन नगर परिषदा आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील ग्रामीण भागातील २९ केंद्र आदी ४४ लसीकरण केंद्रांवरच या ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ देण्याचे नियोजन हाती घेतले जात आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या अध्याप प्राप्त झालेली नाही. महसूल विभागाकडून प्राप्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येनुसार लसीकरण करण्यात येईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठांना स्वत: लसीकरण केंद्रांवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर काही वेळेतच त्यांचे लसीकरण होईल. याप्रमाणोच राज्य शासनाच्या प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करण्याचे नियोजन जिल्ह्यात करण्यात येईल.- डॉ. मनीष रेंघे,  जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणे