Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:47 AM2022-01-21T07:47:54+5:302022-01-21T07:48:13+5:30

१० लाख ४० हजार लसीपासून वंचित

Corona Vaccination One lakh Thanekars Not Taking covid vaccine | Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

Next

- स्नेहा मोरे

मुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेचे महत्त्व अजूनही बऱ्याचा लाभार्थ्यांना समजले नसल्याचे समोर आले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १० लाख ४० हजारांहून अधिक ठाणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. 

राज्यात आरोग्य विभाग स्थानिक प्रशासनासह विविध पातळ्यांवर लस साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यात केवळ आठ जिल्ह्यांत पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. त्यात सिंधुदुर्गमध्ये ३,५२०, वर्धा ३२,६५६, रत्नागिरी ३९,२८२, गोंदिया ५१,३०३, रायगड ७४,०८८, सातारा ९३,२६६ आणि चंद्रपूरमध्ये ९९,०८५ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, अशी माहिती अहवालात नमूद आहे. 

पहिला डोस 
राहिलेले लाभार्थी
ठाणे     १०,४०,१५३ 
नाशिक      ८,०७,३७५ 
जळगाव     ६,८८,०६० 
नांदेड    ६,३६,९४० 
अहमदनगर     ६,१८,१८४ 
औरंगाबाद     ५,४०,५१६ 
बीड    ५,२३,७६८ 

कोविशिल्डचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थी
पुणे    १०,२०,९१९ 
नाशिक     ६,१९,९५८ 
ठाणे    ६,४५,७६७ 
मुंबई    ६,०२,३०७ 
नागपूर     ५,६४,४२९ 

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थी
बुलडाणा      १,५३,१८० 
अमरावती     ९२,७६१ 
वाशिम     ९०,८१६ 
यवतमाळ     ९०,१३५ 
लातूर      ८३,८२४

Web Title: Corona Vaccination One lakh Thanekars Not Taking covid vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.