शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : ग्लोबल टेंडरची चिंता मिटली, महापालिका विकत घेणार पाच लाख लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:04 IST

Corona Vaccination : ठाणे  महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली.

ठळक मुद्देमुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेला ग्लोबल टेंडर काढता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली होती.

ठाणे  : आर्थिक परिस्थिती नसतानाही महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केल्याने हा खर्च कसा उभा करणार असा सवाल मागील काही दिवसापासून अशी चर्चा शहरात सुरु होती. भाजपने देखील या खर्चाच्या मुद्यावरुन प्रशासनाला जाब विचारला होता. परंतु आता ग्लोबल टेंडरची चिंता अखेर मिटली असून ठाणे  महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. (Corona Vaccination: Municipal Corporation to procure 5 lakh vaccines)

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेला ग्लोबल टेंडर काढता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच शासनाकडून येणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असल्याने टेंडर काढणो शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु लसींचा तुटवडा लक्षात घेता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जावे असे स्पष्ट केले होते. त्यानंतर तत्काळ महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जाणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु महापालिकेने अशी तयारी केली असताना त्यासाठी निधी कसा उभारला जाणार असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावरुन भाजपने देखील शंका उपस्थित केली होती. परंतु आता या सर्वाची उत्तरे बुधवारी झालेल्या महासभेत मिळाली आहेत. तसेच भाजपने उपस्थित केलेल्या शंकेची हवा देखील यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी काढली. 

महापालिकेच्या माध्यमातून ५ लाख लसींसाठी टेंडर काढले जाणार असून त्यानुसार एका लसीसाठी १ हजारांचा खर्च अपेक्षित धरला तर साधारणपणो ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा खर्च करण्याची देखील पालिकेची तयारी असून त्यानुसार महासभेत या संदर्भातील आयत्या वेळेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार यासाठी मुंबईला ज्या पध्दतीन रशियाच्या स्फुटनिक लस पुरविण्याचे सुतोवाच केले आहे, त्यानुसार ठाण्यासाठी देखील त्यांना पाचारण केले जाणार असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. तर हा खर्च कसा केला जाणार याचे उत्तरही त्यांनी दिले. ग्लोबल टेंडरसाठी येणार खर्च हा कोविडसाठी राखून ठेवण्यात आलेला २०० कोटीतून केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या