शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : १० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढा!, स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 19:20 IST

Corona Vaccination : ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर रिझन मधील सर्वच महापालिकांना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच ठाणे  महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देठाणे महापालिकेने लसीकरणाचे धोरण जाहीर केले असले तरी यामध्ये गृहसंकुलांना विकत लस घ्यावी लागणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.

ठाणे : ठाणे  महापालिकेने ठाणोकरांचे लसीकरण करण्यासाठी पाच लाख लसींचे ग्लोबल टेंडर काढण्याचे निश्चित केले आहे. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता, पाच लाख नाही तर १० लाख लसींचे ग्लोबल टेंडर काढा अशी मागणी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांनी केली. इतर कामांना ब्रेक देऊन त्या कामांचा निधी लसीकरणासाठी वर्ग करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यानुसार या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर रिझन मधील सर्वच महापालिकांना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच ठाणे  महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण, राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आदींसह इतर सदस्यांनी देखील याविषयी मत व्यक्त करतांना ठाणे  शहराची लोकसंख्या ही ३० लाखाहून अधिक आहे. त्यामुळे पाच लाख लसी या अपुऱ्या पडणार असल्याचे मत यावेळी या सदस्यांनी व्यक्त केले.

त्यामुळे गोष्टीचा विचार करुन पाच लाख नाही तर किमान १० लाख लसींसाठी महापालिकेने ग्लोबल टेंडर काढावे असे मत यावेळी सर्वच सदस्यांनी व्यक्त केले. यासाठी निधी अपुरा पडत असेल तर सध्या जी कामे महत्वाची नाहीत, किंवा इतर कामांचा विकास निधी या योजनेसाठी वापरण्यात यावा असेही यावेळी सदस्यांनी सांगितले.

गृहसंकुलांना मोफत लस द्यावीठाणे महापालिकेने लसीकरणाचे धोरण जाहीर केले असले तरी यामध्ये गृहसंकुलांना विकत लस घ्यावी लागणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. परंतु प्रत्येकाला हे शक्य होईल असे नाही, त्यामुळे महापालिकेने गृहसंकुलांना मोफत लस द्यावी अशी मागणी यावेळी स्थायी समिती सदस्य भरत चव्हाण यांनी केली. त्यानुसार कृष्णा पाटील, हणमंत जगदाळे आणि इतर सदस्यांनी देखील ही मागणी लावून धरली. परंतु आता पालिका प्रशासन या बाबत काय निर्णय घेणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

या संदर्भात आयुक्तांनी योग्य तो विचार करावा आणि त्यानुसार शहरातील प्रत्येकाला लस मिळेल या दृष्टीकोणातून १० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावे अशी मागणी आम्ही स्थायी समितीचे सर्व सदस्य करीत आहोत.- संजय भोईर - स्थायी समिती सभापती, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस