मुंब्य्रात कोरोना नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST2021-06-18T04:28:20+5:302021-06-18T04:28:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या क्षेत्रामधील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाची ...

मुंब्य्रात कोरोना नियंत्रणात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या क्षेत्रामधील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येथे नियंत्रणात आली असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. गुरुवारी येथे एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तसेच बुधवारीही फक्त एक रुग्ण आढळला होता. तत्पूर्वी एक दिवस आधीही येथे एकही रुग्ण आढळला नव्हता. लॉकडाऊनमध्ये दरम्यान लागू केलेल्या निर्बंधांचे अपवादात्मक प्रसंगवगळता स्थानिक नागरिकांनी तंतोतंत पालन केले. तसेच येथील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिल्याने येथील कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती ठामपाच्या मुंब्रा आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटेकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.