राजकीय व्यक्तींकडूनच कोरोना नियमांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:13+5:302021-03-25T04:39:13+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही दोन्ही शहरांमध्ये राजकीय पक्षांची आंदोलने व कार्यक्रम यामध्ये गर्दी जमवून सोशल डिस्टन्सिंगचा ...

Corona rules are flouted by politicians | राजकीय व्यक्तींकडूनच कोरोना नियमांचा फज्जा

राजकीय व्यक्तींकडूनच कोरोना नियमांचा फज्जा

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही दोन्ही शहरांमध्ये राजकीय पक्षांची आंदोलने व कार्यक्रम यामध्ये गर्दी जमवून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर रविवारी आंदोलन केले, मनसेने वडवली पुलाचे उद्घाटन केले, तर कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे मंगळवारी रात्री उशिरा पाहायला मिळाले. बँजोच्या तालावर नाचत, फटाके फोडत साजऱ्या झालेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलने, मोर्चे काढण्यावर बंधने घातली आहेत. कार्यक्रमांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घातल्या आहेत. मनपा हद्दीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असताना राजकीय व्यक्तींना याचे गांभीर्य नाही, हेच त्यांच्या वागणुकीतून दिसते. सामान्य नागरिकांनी कोरोनाचे नियम मोडले, तर त्यांच्यावर मनपा अथवा पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, राजकीय व्यक्तींच्या बेजबाबदार कृत्यांकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होते किंवा हेतुत: दुर्लक्ष केले जाते. ‘राजकीय व्यक्तींना सूट आणि जनतेची लूट’ असे धोरण यंत्रणांनी स्वीकारले आहे का, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. राजकीय व्यक्तींकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जातात, अशावेळी गस्त घालणारी पथके कुठे लपतात, असा लोकांचा सवाल आहे.

------------------------------------------------------

वाचली

Web Title: Corona rules are flouted by politicians