ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये १,९६६ ने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:50+5:302021-05-09T04:41:50+5:30

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांत १ हजार ९६६ जणांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेत मृतांची संख्या शनिवारी ...

Corona patients in Thane district increased by 1,966 | ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये १,९६६ ने वाढ

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये १,९६६ ने वाढ

Next

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांत १ हजार ९६६ जणांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेत मृतांची संख्या शनिवारी वाढली आहे. गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ७३७ बाधित व आठ हजार तीन मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरात ४७९ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. शहरात १ लाख २३ हजार ७१७ रुग्णांची व १ हजार ७४४ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. कल्याण- डोंबिवलीत ५३३ रुग्णांची वाढ झाली तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १ लाख २५ हजार ९६० बाधित असून १ हजार ५३० मृतांची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये ७० रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ३७५ रुग्णांची व ४४५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत १२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला. येथील रुग्णांची संख्या १० हजार ३५ व ४०३ मृत्यू नोंदवले गेले आहेत. मीरा- भाईंदरला दिवसभरात २२५ बाधितांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या शहरात आजपर्यंत ४५ हजार ७६२ बाधित व १ हजार १०५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथला ७० बाधित सापडले असून एकाचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या १८ हजार ४१७ बाधित व ४९३ मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ९७ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. या शहरात १९ हजार ४९० बाधितांची व २११ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. ग्रामीण भागात २४१ रुग्ण सापडले व आठ जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत या परिसरातील बाधितांची संख्या २९ हजार ७४ व ७३० मृत्यू नोंदवले आहेत.

Web Title: Corona patients in Thane district increased by 1,966

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app