कोरोना रुग्णांना गाण्यांमधून मानसिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:37+5:302021-05-25T04:45:37+5:30
मुंब्रा : ‘हर घडी बदल रही है रूप जिंदगी’ यांसारख्या जीवनातील चढउतार सांगणाऱ्या गाण्यांमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना मानसिक ...

कोरोना रुग्णांना गाण्यांमधून मानसिक आधार
मुंब्रा : ‘हर घडी बदल रही है रूप जिंदगी’ यांसारख्या जीवनातील चढउतार सांगणाऱ्या गाण्यांमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्याचा तसेच त्यांच्यातील अनामिक भीती घालवण्याचा प्रयत्न मुंब्र्यातील कौसा भागातील मौलाना अबुल कलाम स्टेडियममधील कोविड आरोग्य केंद्रातील डाॅक्टर आणि इतर कर्मचारी करत आहेत. कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रुग्णांपैकी काहींवर अतिदक्षता विभागात, तर काहींवर सर्वसामान्य विभागात १४ ते २२ दिवसांपर्यंत कोविड रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. उपचारांदरम्यान अनेक कोरोनाग्रस्त मानसिकदृष्ट्या खचतात. घरी गेल्यावर कुटुंबातील सदस्य तसेच समाज आपल्याशी कसा वागेल, अशी भीतीही त्यांच्या मनात रुग्णालयामधून बरे हाेऊन घरी जाताना असते. या रुग्णांना मानसिकदृष्ट्या धीर देण्यासाठी त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मुंब्रा येथील या केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये वरील गाण्यांसह इतर अनेक गाण्यांवर नृत्य करून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना हार, फुले भेट देऊन त्यांना हसत-हसत घरी पाठवले जाते.
अनुभव साेशल मीडियावर
कोरोना झाल्याचे कळताच रुग्णांनी हतबल होऊ नये, यासाठी बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याची माहिती केंद्राचे समन्वयक मुमताज शहा तसेच डाॅक्टर शार्मिन डिंग्गा यांनी ‘लोकमत’ला दिली.