शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण ८० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 06:02 IST

१४७४ नवे रुग्ण तर ३६ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ४७४ नव्या रुग्णांची सोमवारी वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ८० हजार ४१ झाली आहे. याशिवाय ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या दोन हजार १८९ झाली आहे.सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवे २२६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात १७ हजार ९५८ रुग्णसंख्या झाली. तर तिघांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा ५९९ झाला आहे. सोमवारी ५०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. समाधानाची बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्के झाले आहे. यानुसार १२ हजार ८७ जण बरे झाले आहेत.नवी मुंबईत ३१४ नव्या रुग्णांची सोमवारी भर पडली असून सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या १३ हजार ९३२ झाली असून मृतांची संख्या ३९४ वर पोहचली आहे.मीरा-भार्इंदरमध्ये नवे १०६ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या पाच हजार ६५३ तर मृतांची २५६ झाली आहे. उल्हासनगरमध्ये कोरोनामुळे सोमवारी चौघांचा मृत्यू झाला. तर नवे ९३ रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता मृतांची संख्या ११६ झाली. समाधानाची बाब म्हणजे सोमवारी १९६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ५३८ तर मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या चार हजार ६३९ झाली आहे. उपचार घेणारे अ‍ॅक्टिव रुग्ण एक हजार ७८३ रुग्ण आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात सोमवारी ५१ बाधित आढळले. तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे मृतांची संख्या १९० वर पोहोचली आहे. बाधितांची संख्या तीन हजार ५०५ झाली आहे. अंबरनाथमध्ये ७७ रुग्णांची तर, एका मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५८८ झाली. तर मृतांची १४० वर गेली आहे. बदलापूरमध्ये नवे ५२ रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३६० झाली. या शहरात सोमवारी सहा जण दगावल्याल्यामुळे ४१ मृत्यूची सोमवारपर्यंत नोंद झाली आहे.ठाणे ग्रामीण भागात २२५ नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ६५३ तर मृतांची संख्या १३७ वर गेली आहे.

वसई-विरारमध्ये पाच रुग्णांचा मृत्यूवसई : वसई-विरार महापालिका परिसरामध्ये सोमवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी दिवसभरात १८३ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ३७३ वर पोहोचली आहे. दरम्यान, १२२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वसई दोन, नालासोपारा एक आणि विरारमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर पालिका हद्दीत एकूण २३२ रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर दिवसभरात १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये वसई-४५, नायगाव-६, वसई-विरार-१०, नालासोपारा-५८ आणि विरार-६४ रुग्णांचा समावेश आहे. यात एकूण ११३ पुरुष तर ७० महिला बाधित ठरल्या आहेत. दरम्यान, शहरात १२२ रुग्ण घरी परतले असून आजवर मुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ४०८ वर पोहोचली आहे. त्यासोबत शहरात एकूण ३ हजार ७३३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस