शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बाहेर कोरोनाचा, घरात पाण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 2:58 AM

पावसाने मोठी पडझड : झाडे पडली, घरांसह वाहनांचेही नुकसान, ग्रामीण भागात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनसामान्य अगोदरच त्रासले असताना, दोन दिवसांपासून पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन शासनाकडून केले जात असले तरी, पावसामुळे अनेकांना घरात राहणेही शक्य होत नाही. ठाणे शहरासह मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि उल्हासनगरातही घरांची पडझड झाली असून, अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाहेर कोरोनाचा तर घरात पाण्याचा धोका, अशा दुहेरी संकटात जनसामान्य सापडले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणे तालुका आणि शहर परिसरात पडला. ठाणे शहरात २६ झाडे पडली असून, वागळे ईस्टेटमध्ये एक किराणा दुकान नऊ घरांवर पडून नुकसान झाले. याशिवाय आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या. भिवंडी शहरातील अनेक रस्ते पावसाने उखडले आहेत. येथील ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. कोंडेश्वरजवळील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक घरांची मोठी पडझड झाली. या ग्रामीण भागातील संपूर्ण विद्युत यंत्रणा कोलमडली असून ती दुरुस्त करायला आठवडाभर लागण्याची शक्यता आहे. या भागातील अनेक मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत.डोंबिवलीत बुधवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याशिवाय दिवसभर वारा आणि पावसाचे प्रमाण चांगलेच होते. झाड आणि झाड्याच्या फांद्या पडण्याच्या घटना वगळता शहरात कोणतीही दुर्घटना घडली नाही.उल्हासनगर शहरात जोरदार वाऱ्यासह संततधार पावसाने विजेचा लपंडाव सुरू असून आठपेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. याशिवाय दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या.कल्याण, डोंबिवलीत पावसासह सोसाट्याचा वाराडोंबिवलीत ठिकठिकाणी झाडे पडली : विजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले, बाजारपेठेत शुकशुकाटलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात बुधवारी रात्री सोसाट्याचा वाºयासह जोरदार पाऊस झाला. त्यात अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. गुरुवारी दिवसभरात पावसाच्या लहानमोठ्या सरी कोसळल्या. डोंबिवली पूर्वेत सुनीलनगर आणि पश्चिमेला भावे सभागृहासमोर अशा दोन ठिकाणी झाडे पडली. मनपाच्या आपत्कालीन विभागातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही झाडे हटवली.

कल्याण-डोंबिवलीत सोमवारपासून चांगला पाऊस झाला. गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळलेले होते. अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या. रात्री पडलेल्या पावसामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लोकल सेवेचा अंदाज घेत सकाळी कामावर जाण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी चौकात खासगी कंपन्या व अन्य सरकारी कार्यालयांतील कर्मचाºयांचीही कमी गर्दी होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काहींनी एसटीने मुंबईने गाठली.दुसरीकडे अनलॉकमध्ये सम-विषम पद्धतीने दुकाने उघडली जात आहेत. अनेक दुकानदारांनी सवलती देऊनही ग्राहकांनी पाठ फिरवली. पावसामुळे भाजीमार्केटमध्ये फारसी गर्दी नव्हती. श्रावणी शुक्रवारसाठी फळे, फुले, हार आणि दुग्धजन्य पदार्थांची लोकांनी खरेदी केली. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याRainपाऊस