शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सक्रिय नगरसेवकांना कोरोनाची बाधा; फोन, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीओ कॉलिंगचा घेतला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:22 IST

मदतीचे वाटप, काहींची पीपीई किट घालून रुग्णालयात धाव

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत झाला, तेव्हा कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काही नगरसेवकांनी घराबाहेर न पडता फोन, व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हिडीओ कॉलिंगद्वारे नागरिकांशी संपर्क ठेवला. त्या काळात त्यांची कार्यालये कुलूपबंद होती. जे नगरसेवक सोशल मीडियाच्या वापराबाबत फारसे आग्रही नव्हते, त्यांनी कार्यालये सदैव उघडी ठेवून मदतीचा ओघ सुरू ठेवला. काहींना कोरोनाशी सामना करताना जीव गमावावा लागला. महापालिका हद्दीत सुरुवातीला सामान्य जनतेला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे ठिकठिकाणी काम केले गेले. मुदलात केडीएमसीचे बहुतांश नगरसेवक कोरोनाकाळात सक्रिय होते.

कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी अन्नधान्यवाटप केले. तसेच दररोज जेवणाची सोय केली. घरोघरी जाऊन मदतीचा हात दिला. केवळ फोनवर उपलब्ध न होता स्वत: जनतेत मिसळून काम केले. रुग्णालयाकडून लूट केली जात असताना पीपीई किट घालून रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात धाव घेतली. कोरोनाकाळात रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नव्हते, तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. आडिवली-ढोकळी परिसरातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी त्यांच्या कार्यालयातून अन्नधान्यवाटप, भाजीपालावाटपाचे काम केले. तसेच स्वत: पीपीई किट घालून थर्मल स्कॅनिंग करण्याचे काम केले. रुग्णालयास व्हेंटिलेटरही दिले.

शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी तब्बल तीन महिने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने जेवणाचे वाटप केले. शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रात्रीच्या वेळेस त्यांच्या प्रभागात निर्जंतुकीकरणाचे काम केले. त्यांनीही अन्न व भाजीपालावाटपाचे काम केले. सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सामान्यांना रेशनचे धान्य योग्य प्रकारे वाटप केले जात आहे की नाही, यावर देखरेख ठेवत मदतीचा हात दिला. भाजप नगरसेवक मनोज राय यांनी दोन महिने १५ टनांपेक्षा जास्त अन्नधान्याचे वाटप केले. त्या काळात त्यांच्या आईचे निधन झाले, तरी त्यांनी मदतीचे काम थांबविले नाही. शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी अन्नधान्य व भाजीपाल्याचे वाटप केले. त्यांना मधुमेहाचा आजार असतानाही त्यांनी कोरोनाकाळात मदतीचे काम केले. शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी रात्रंदिवस कोरोना रुग्णांसाठी काम केले. महापौर विनीता राणे याही पीपीई किट घालून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.काहींनी कार्यालये ठेवली कुलूपबंद, कोरोनामुळे भेट घेणे टाळलेकोरोनाकाळात मदतीचे काम करीत असताना शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी यांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरे झाले. तसेच स्थायी समिती सदस्य पुरुषोत्तम चव्हाण यांनाही कोरोना झाला. तेही बरे झाले. सातत्याने प्रभागात स्वत: जंतुनाशकफवारणी करणारे अपक्ष नगरसेवक काशीफ तानकी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. शिवसेना नगरसेवक व गटनेते दशरथ घाडीगावकर यांना मदतकार्य करीत असताना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच परिवहन समिती सदस्य नाना यशवंतराव यांचाही कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाला. ते जनतेत मिसळून काम करणारे कार्यकर्ते होते. काही सदस्यांनी कोरोनाच्या भीतीपोटी जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परंतु, त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत मदतीचे वाटप केले. अनेकांनी केवळ मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप कॉल, व्हिडीओ कॉलद्वारे आॅनलाइन संपर्क साधला. या सदस्यांविरोधात नागरिकांमध्ये रोष होता. काहींनी तर कार्यालये कुलूपबंद ठेवली होती. कोरोनाचे कारण देत भेट घेणे टाळले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv Senaशिवसेना