शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महापालिका हद्दीत आता केवळ ठाण्यातीलच कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेणार, महापालिका आयुक्तांना काढला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:41 IST

महापालिका हद्दीतील कोरोना बाधीत रुग्णांवरच आता ठाणे महापालिका हद्दीत उपचार केले जाणार आहेत. शहराबाहेरील रुग्णांनी ते वास्तव्य करीत असतील त्याच ठिकाणी उपचार करावेत असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काढले आहेत.

ठाणे : दिवसेंदिवस ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यानुसार शहरातील रुग्णालये देखील कमी पडण्याची भिती महापालिकेला वाटू लागली आहे. त्यामुळे भविष्यातील हा धोका डोळयासमोर ठेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी यापुढे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांनाच ठाण्यातील रुग्णालयात उपचार मिळतील असा आदेश काढला आहे. त्यामुळे आता शहराबाहेरील रुग्ण असेल तर त्याला तो ज्या ठिकाणी वास्तव्यास असेल त्याच ठिकाणी उपचार त्याला घ्यावे लागणार असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.                  ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ८०० च्या आसपास येऊ न ठेपली आहे. त्यात उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या २३६ च्या एवढी आहे. तर आजही महापालिकेच्या भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात हायरीस्कमधील ८०० च्या आसपास रुग्ण आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यात सध्या जी काही खाजगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये, हॉटेल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या १ हजार १५१ एवढी आहे. तसेच भविष्यात रुग्णांची संख्या वाढणार असल्याने यासाठी आणखी काही खाजगी रुग्णालये यासाठी आरक्षित करावी लागणार आहेत. त्या दृष्टीने महापालिकेकडून आतापासूनच हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात ठाणे शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. त्या दृष्टीने येथील रुग्णांना अधिक प्राधान्य देणे महत्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील वाढत्या रुग्णांना आरक्षित करण्यात आलेली रुग्णालये त्या ठिकाणच्या खाटा कमी पडणार असल्याचे पालिकेचे मत आहे. त्या अनुषंगाने आता महाापलिका आयुक्त विजय सिंघल यांनी हे पाऊल उचलले आहे.त्यानुसार आता शहराबाहेरील रुग्णांना आता यापुढे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार मिळणार नसल्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. त्यानुसार मे अखेर पर्यंत ८५०८ खाटांची गरज शहराला भासणार आहे. त्यामध्ये किरकोळ लक्षणे असणारे ६० टक्के रुग्ण (५१०५) रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल, तरी २० टक्के रुग्णांना १७०२ मध्यम स्वरुपातील लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डीसीएचसी (डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर) मध्ये दाखल करणे अपेक्षित आहे. तर ज्या रुग्णांना विशेषतज्ञांच्या सेवा लागतील अशा १७०२ रुग्णांना डीसीएच (डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल) मध्ये दाखल करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आल्याचे पालिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या