शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

ठाण्यात १५ पोलिसांना कोरोनाची लागण: ८७ पोलीस आता विलगीकरणात

By जितेंद्र कालेकर | Updated: April 18, 2020 00:41 IST

लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाऱ्यांसह १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस दलात सध्या भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयातील ६ जणांना लागणमुंब्य्रातील ३८ कर्मचारी विलगीकरणात

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाºया पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाºयांसह १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील ७२ कर्मचारी आणि १५ पोलीस अधिकाºयांना आता विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.यामध्ये मुंब्रा, वर्तकनगर, ठाणेनगर, पोलीस मुख्यालय आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील कर्मचायांचा समावेश आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असले तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर कारवाई करीत असतांनाच पोलिसही कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याचीसुरु वात मुंब्य्रापासून झाली. येथील दोन निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाºयाला लागण झाल्यावर १९ कर्मचारी केंद्रात तर १९ कर्मचा-यांना घरात विलगीकरण केले. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या आधी दोन नंतर चौघांना लागण झाल्याचे समोर आहे. दोन कोरोनाबाधित आरोपींच्या संपर्कामुळे वर्तकनगरच्या तिघांना तर नारपोलीच्या एकाला लागण झाली. आतापर्यंत चार अधिकारी आणि ११ कर्मचारी अशा १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयांने दिली. खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंब्रा येथील ३८ तसेच वर्तनगरचे १४ केंद्रात तर ६ घरात विलगीकरणात आहेत. ठाणेनगरच्या सहा अधिकाºयांनाही घरातच विलगीकरणात ठेवले आहे. नारपोलीतील पोलीस कर्मचारी हा सातारा येथून आल्यानंतर त्याला थेट विलगीकरणात ठेवले होते. तिथून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. तो पोलीस ठाण्यात न आल्यामुळे तेथील एकाही कर्मचाºयाला विलगीकरणात ठेवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पोलिसांवरील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर ठाण्यातही सॅनिटायझिंग व्हॅनची व्यवस्था केली आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ठिकठिकाणी ही व्हॅन फिरुन निर्जंतुकीकरणाचे काम करणार आहे. याशिवाय पोलिसांच्या सुरक्षेसाठी त्यांना पुरेशा प्रमाणात मास्क, हॅण्ड ग्लोज, पीपी किट पुरविली आहेत. तसेच पोलीस वसाहतींमध्येही मोठया प्रमाणात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस