उपवासाच्या पदार्थांना यंदा लागली कोरोनाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:44 AM2020-07-26T03:44:53+5:302020-07-26T03:45:03+5:30

हॉटेलचालकांची माहिती : यंदाच्या श्रावणात केवळ पारंपरिक पदार्थांवर भर

Corona has been hit by fasting foods this year | उपवासाच्या पदार्थांना यंदा लागली कोरोनाची झळ

उपवासाच्या पदार्थांना यंदा लागली कोरोनाची झळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : श्रावण महिना सुरू झाला की, खवय्यांसाठी उपाहारगृह, हॉटेलमध्ये उपासाच्या विविध पदार्थांची रेलचेल सुरू होते. एरव्ही, केवळ उपवासाच्या दिवशीच मिळणारे हे पदार्थ श्रावणात संपूर्ण महिनाभर मिळत असल्याने खवय्ये या पदार्थांवर चांगलाच ताव मारतात. यंदा मात्र उपासाच्या पदार्थांना कोरोनाची झळ बसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खास श्रावणात खवय्यांसाठी नवनवीन उपासाचे पदार्थ बनविले जातात. यंदा कोरोनामुळे मर्यादित पारंपरिक उपवासाचे पदार्थ बनविले जात असल्याचे उपाहारगृह व हॉटेलमालकांनी सांगितले.
श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांसाठी खवय्ये खास उपाहारगृह किंवा मराठमोळी हॉटेल गाठतात. महिनाभर हे पदार्थ दररोज उपलब्ध करून दिले जातात. खवय्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून नवीन पदार्थदेखील उपलब्ध करून दिले जातात. साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, उपवासाची इडली, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, थालीपीठ, वऱ्याचा भात, वºयाची खिचडी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, रताळ्याचा कीस, शिकरण, भाजणी, मलई मटका लस्सी, थालीपीठ कचोरी, पुरी भाजी, मसाला दूध, लस्सी, पीयष, गुळाचा खरवस, दुधी हलवा, शेंगदाणा चटणी, उपवासाची थाळी असे विविध चवीचे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध केले जातात. त्यासाठी खास मेन्यू यादीच असते.
दरवर्षी सर्रासपणे हे पदार्थ उपलब्ध असतात. परंतु, कोरोनामुळे काही उपाहारगृहांचे मालक आॅर्डरप्रमाणे हे पदार्थ बनवित आहेत. मराठमोळे हॉटेल, उपाहारगृहमध्ये यंदा ठरावीक पदार्थच बनविले जात आहेत. दुकानांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ महापालिकेने ठरवून दिली आहे. त्यात एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्यास सांगितल्याने ९० टक्के फटका बसल्याचे उपाहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले.

ग्राहकांची
संख्या रोडावली
कोरोनामुळे ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे. खास श्रावणात दरवर्षी आम्ही नवीन पदार्थ उपलब्ध करून देत असतो. कोरोनामुळे यंदा ते करू शकत नाही. कमी मनुष्यबळ असल्याने ठरावीक पारंपरिक पदार्थ बनविण्यावरच भर दिला जात आहे, असे हॉटेलमालक सनी पावसकर यांनी सांगितले.

Web Title: Corona has been hit by fasting foods this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.