शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
4
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
5
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
6
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
7
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
8
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
9
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
10
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
11
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
12
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
13
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
14
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
15
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
16
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
17
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
18
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
19
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
20
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा परिणाम : खाडी, तलावाचे पाणी झाले स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:32 IST

Thane : मूर्ती विसर्जनामध्ये ३७ टक्के घट नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंमलात आणली.

ठाणे : कोरोनामुळे कधी नव्हे, ते ठाण्यातील खाडीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. सोबतच महापालिकेचे कृत्रिम तलाव आदींच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली, परंतु शहरातील साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता घसरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.गणेशोत्सवात गेल्या वर्षी ३७ हजार ६० मूर्तीचे विसर्जन झाले होते. यावेळी कोरोनामुळे २३ हजार ११७ मूर्तीचे विसर्जन झाले. मूर्ती विसर्जनामध्ये ३७ टक्के घट नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंमलात आणली.

अनेकांनी मातीच्या, तसेच शाडू मातीच्या मूर्तींना पसंती दिली. त्यामुळे जलप्रदूषण कमी झाले. दुसरीकडे पाण्यातील जैविक पर्यावरण निरोगी राहण्यासाठी विरघळलेला ऑक्सिजन ४ मिली ग्रॅम / प्रति लीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे असते. महापालिका क्षेत्रातील ३५ तलावांच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी प्रदूषण नियंत्रण कक्षाने केली. त्यात दिवा तलाव वगळता, उर्वरित सर्व तलावांमध्ये विरघळलेला ऑक्सिजन ४ मिली ग्रॅम / प्रति लीटरपेक्षा जास्त आढळला.

साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता घसरली- महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील वितरण प्रणाली, तसेच साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एप्रिल, २०१९ ते मार्च, २०२० या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने घेतले. - त्यात वितरण प्रणालीच्या पाण्याच्या १२ हजार ९०१ नमुन्यांपैकी ९५ टक्के नमुने पिण्यायोग्य आढळले. ५ टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. - साठवणुकीच्या टाक्यांमधील पाण्याचे १८ हजार ९८८ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के नमुने पिण्यायोग्य, तर २० टक्के नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. - अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वितरण प्रणाली आणि साठवणुकीच्या पाण्याची गुणवत्ता एक टक्क्याने सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणे