शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाकडून म्हाडाच्या रुग्णालयातील १४ कोटींची कोरोना सामुग्री लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 22:35 IST

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावले होते. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे तब्बल १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केल्याची बाब समोर आली आहे. थेट मंत्र्यांनीच आरोप केल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोपमंंत्र्यांच्याच आरोपामुळे पालिकेत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावले होते. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे तब्बल १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केल्याची बाब समोर आली आहे. जर, हे साहित्य जसे होते त्या स्थितीत ४८ तासात पुन्हा ठेवण्यात आले नाही तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली होती. कौसा येथे म्हाडाच्या वतीने अद्ययावत अशा कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन डॉ. मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आव्हाड यांनी कौसा येथील रुग्णालयाची पाहणी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.या प्रकारामुळे आव्हाड हे संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणाऱ्या डॉ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरुडकर यांनी रुग्णालयातील सुमारे ९४ व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाईपलाईन देखील तोडून टाकण्याचे काम डॉ. मुरुडकर यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? असा सवाल करीत अशा बेजबाबदार अधिकाºयाला तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या ४८ तासांमध्ये सर्व साधने पूर्वस्थितीत आणून सुरु न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. 

‘‘ मुंब्रा येथील कौसा कोविड सेंटर डिसेंबर २०२० मध्ये बंद झाले होते. त्यामुळे तेथील साधनसामुग्री ही तशीच पडून होती. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या परवानगीने या सामुग्रीमधील ३० व्हेंटीलेटर ग्लोबल हॉस्पीटल आणि ६४ पार्र्किं ग प्लाझा हॉस्पीटल मध्ये ठेवले होते. ते लंपास केले नाही. यातील पार्र्किंग प्लाझाचे व्हेंटीलेटर्स परत केले. ग्लोबलचेही परत केले जाणार आहे. गृहनिर्माण मंत्र्यांची परवानगी घेतली नाही. हीच चुक झाली.’डॉ. राजू मुरुडकर, आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस