जिल्ह्यात कोरोनाचे ३५० रुग्ण, आठ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:24+5:302021-08-01T04:37:24+5:30

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण आढळून आले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे ...

Corona 350 patients, eight deaths in the district | जिल्ह्यात कोरोनाचे ३५० रुग्ण, आठ मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे ३५० रुग्ण, आठ मृत्यू

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण आढळून आले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत ५६ रुग्णांची वाढ झाली. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत ८७ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण वाढ झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. भिवंडी परिसरात एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच मृत्यूही झालेला नसल्याने तेथील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मीरा-भाईंदरला ६४ रुग्णांची वाढ झाली. येथेही एकही मृत्यू झाला नाही. अंबरनाथमध्ये १८ रुग्ण वाढले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली. तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३६ रुग्ण सापडले असून एकाही मृत्यूची नोंद नाही.

-------------------

Web Title: Corona 350 patients, eight deaths in the district