कोपरीत जुन्या इमारतीची गॅलरी पडली; ठाण्यात तासाभरात 11 मिमी पाऊस   

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:49 PM2020-07-16T13:49:01+5:302020-07-16T13:56:00+5:30

कोपरीच्या चिखलवाडी येथील ही गायत्री बिल्डींग धोकादायक आहे. त्यामुळे तेथील आधीच अन्यत्र हलवलेले आहेत. आज या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गँलरीचा भाग पडला.

In the corner fell the gallery of the old building; 11 mm of rain per hour in Thane | कोपरीत जुन्या इमारतीची गॅलरी पडली; ठाण्यात तासाभरात 11 मिमी पाऊस   

कोपरीत जुन्या इमारतीची गॅलरी पडली; ठाण्यात तासाभरात 11 मिमी पाऊस   

Next

ठाणे - येथील कोपरीतील एका 35 वर्षांच्या जुन्या मारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गँलरीचा भाग आज सकाळी पडला ; ही इमारत आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे येथे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पावसाची रिपरिप सूरुच असल्यामुळे अवघ्या तासाभरात 11.17 मिमी पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिकेने घेतली आहे. पाणी पुरवठा करणार्‍या धरणाच्यां पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी  आहे. 
      कोपरीच्या चिखलवाडी येथील ही गायत्री बिल्डींग धोकादायक आहे. त्यामुळे तेथील आधीच अन्यत्र हलवलेले आहेत. आज या इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गँलरीचा भाग पडला.  ब्रह्मांड, चरई आणि शिळफाटा येथील तीन वृक्ष उन्मळून पडले. तर नौपाडा, पोखरण रोडवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. वागळे ईस्टेट, नौपाडा येथे काही झाडे धोकादायक स्थितीत आहेत. जिल्ह्यातील पावसाच्या या संभाव्य धोक्यास अनुसरुन पुणे येथून एनडीआरएफ चे पथक कालपासून आधीच ठाण्यात तैनात झाले आहे.  

जिल्ह्यातील महापालिका, गांवपाड्यां ना पाणी पुरवठा करणार्‍या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात आजपर्यंत 33.04 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. उल्हास खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे मागील आठवड्यात उल्हास नदी दुथडी भरून वाहिली. मात्र आता या खोर्‍यात आता पावसाने विश्रांती घेतली आहे. या धरण क्षेत्रात 2 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात 90.70मिमी पाऊस 24 तासात पडला आहे. मुंबई ला पाणी पुरवठा करणार्‍या भातसा धरणा अवघा 8 मिमी पाऊस पडला. या धरणात 46.47 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. मोडक सागरमध्ये अवघा 5 मिमी पाऊस झाला. या धरणात 38 टक्के साठा आहे. तानसात 2 मिमी पाऊस झाला. आतापर्यंत 23 टक्के पाणी साठा झाला आहे. बारवी 5 मिमी पाऊस झाला असून 45 टक्के पाणी साठा तयार झाला आहे.

Web Title: In the corner fell the gallery of the old building; 11 mm of rain per hour in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे