समाजासाठी झटणाऱ्यांना साथ द्या

By Admin | Updated: April 1, 2017 05:29 IST2017-04-01T05:29:05+5:302017-04-01T05:29:05+5:30

समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्यांमागे समाजानेही उभे राहिले पाहिजे, असे आवाहन डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी येथे केले.

Coordinate the community to the joltists | समाजासाठी झटणाऱ्यांना साथ द्या

समाजासाठी झटणाऱ्यांना साथ द्या

डोंबिवली : समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्यांमागे समाजानेही उभे राहिले पाहिजे, असे आवाहन डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी येथे केले.
छायाचित्रकार मनोज मेहता हे आपल्या मातापित्याच्या स्मरणार्थ समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींना २० वर्षांपासून कैलासभाई मेहता आणि पुष्पलता मेहता पुरस्काराने सन्मानित करतात. या पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. त्याप्रसंगी भिशीकर बोलत होत्या.
कैलासभाई मेहता पुरस्कार पूर्वांचलमध्ये कार्य करणाऱ्या जयवंत कोंडविलकर यांना, तर पुष्पलता मेहता पुरस्कार वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या शिल्पा कशेळकर यांना देण्यात आला. पत्रकार भगवान मंडलिक यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
डॉ. भिशीकर म्हणाले, सध्या सेल्फीचा जमाना आहे आणि मनोज मेहता हे आपल्या कॅमेऱ्यातून डोंबिवलीतील रत्ने शोधून त्यांच्या कार्याचे कौतुक करीत आहेत. तसेच आपल्या आईवडिलांच्या नावाने त्यांना गौरवतात. असे उदाहरण महाराष्ट्रातील एकमेव आहे. पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांनी असेच कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
जयवंत कोंडविलकर यांनी पूर्वांचल भागात काम करताना येणारे अनुभव सांगितले. या भागातील नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा तसेच पूर्वांचलमधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना साहाय्य करावे, असे आवाहन केले.
शिल्पा कशेळकर यांनी वंचित महिलांसाठी काम करताना आलेले अनुभव सांगितले. वेश्या वस्तीमध्ये काम करताना, एचआयव्हीग्रस्त महिलांच्या समस्या सोडवताना, मुस्लिम महिलांचे प्रश्न सोडवताना, कशेळकर यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावर काटा आला.
मंडलिक यांनी डोंबिवलीतील समस्यांचा पाढा वाचला. या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. विकासनिधीमध्ये कशी हेराफेरी केली जाते, याची आकडेवारी सादर केली.
याप्रसंगी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, माधव जोशी, आबासाहेब पटवारी, डॉ. कवी, मनोहर शेठ, डॉ. शंतनू नवरे, अशोककुमार दोशी, सदानंद थरवळ, स्नेहल दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक महेश देशपांडे, तर मधुरा ओक हिने सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Coordinate the community to the joltists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.