शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

उशिरा पगार काढणाऱ्या त्या ठेकेदाराचा ठेका होणार रद्द, पालिकेने सुरु केली तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:19 PM

मागील दोन वर्षापासून कामगारांचे पगार उशिराने काढणाºया ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. या संदर्भात येत्या १८ आॅगस्ट रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.

ठळक मुद्देपालिका १.२० कोटींची अनामत रक्कम जप्तनवा पर्यायही शोधला जाणार

ठाणे - आॅटोमेशनच्या नावाखाली किंबहुना पालिकेतील विविध विभागातील कारभार एकाच छताखाली आणून आयटी सेव्ही कारभार करण्याचा प्रयत्न अंगलट आल्याचे उघड झाल्यानंतर याची दखल आता महापौरांबरोबरच पालिकेने सुध्दा घेतली आहे. वांरवांर ठेकेदाराकडून त्याच त्याच चुका होत असल्याने आता संबधींत ठेकेदाराचा ठेका रद्द करुन त्याची अनामत रक्कमही पालिका जमा करणार आहे. त्यानुसार पुढील महिन्यापासून कामगारांचा पगार वेळेतच निघणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.                      ठाणे महापालिकेच्या विविध विभागांचा समन्वय साधून कामकाजात सुसूत्रता यावी तसेच महापालिकेचा कारभार पेपरलेस व्हावा या उद्देशातून प्रशासनाने ईआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) ही संगणक प्रणाली सुरु केली. मात्र, मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रणालीतील त्रुटी अजूनही संबंधित ठेकेदाराला दूर करता आलेल्या नसल्यामुळे महापालिका कर्मचाºयांचे पगार उशीराने होऊ लागले आहेत. पाच ते सहा दिवस पगार उशीराने होत असल्यामुळे त्यांचे कर्जाचे हफ्ते ठरलेल्या वेळेवर भरले जात नाही. त्यामुळे अतिरिक्त शुल्काचा भार कर्मचाºयांवर पडत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर महापौरांनी याची दखल घेतली. त्यानंतर आता पालिकेनेसुध्दा याची दखल घेत, कामगारांच्या पगार हाती दिला आहे.परंतु यापुढे जाऊन आता संबधींत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार त्याला पत्रव्यवहार करण्यात येणार असून, येत्या १८ आॅगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक लावण्यात आली आहे. या बैठकीत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. यापुढेही जाऊन त्याची १ कोटी २० लाखांची अनामत रक्कमही पालिका आपल्याकडे जमा करणार आहे.               या संदर्भात बैठक लावण्यात आली असून संबधींत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचेही निश्चित करण्यात येत आहे. परंतु यावर नवीन काही    प्रणाली शोधता येईल का? याचा अभ्यासही सुरु झाला आहे.(ओमप्रकाश दिवटे - उपायुक्त, आस्थापना, ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त