कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा
By Admin | Updated: November 16, 2016 04:28 IST2016-11-16T04:28:08+5:302016-11-16T04:28:08+5:30
गेल्या महिन्यात भुयारी गटाराचे चेंबर साफ करताना शिवकुमार जयरामन याचा मृत्यू झाला होता. त्याला कंत्राटदाराने सुरक्षेची साधने

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा
अंबरनाथ : गेल्या महिन्यात भुयारी गटाराचे चेंबर साफ करताना शिवकुमार जयरामन याचा मृत्यू झाला होता. त्याला कंत्राटदाराने सुरक्षेची साधने दिली नसल्याचा आरोप होता. याप्रकरणी आता कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये चेंबर साफ करताना शिवकुमार या कंत्राटी सफाई कामगाराचा गुदमरु न मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या आठवडाभरापूर्वी येथेच एक कंत्राटी सफाई कामगार गुदमरल्यामुळे अत्यवस्थ झाला होता. मात्र त्यानंतरही पालिकेच्या कंत्राटदाराने सुरक्षेच्या पुरेशा बाबी तपासल्या नसल्याचे समोर आले होते.
त्यानंतर रोटरी सभागृहासमोरील चेंबर साफ करण्यासाठी २० फूट खोल चेंबरमध्ये शिवकुमार उतरला असता आतील वायूच्या वासाने तो गुदमरून बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याच्या अन्य साथीदारांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र वायूचा दुर्गंध इतका प्रभावी होता की खाली उतरणे शक्य झाले नाही. त्यामुळे तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. अथक परिश्रमानंतर शिवकुमारला बाहेर काढण्यात यश आले मात्र त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले.
सुरक्षेच्या उपाययोजना आणि साधन घेतल्याशिवाय कामगार सफाईसाठी उतरल्याने ही घटना घडली. (प्रतिनिधी)