वनेतर कामांस बंदी असलेल्या जागेत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:29 IST2021-02-23T23:29:54+5:302021-02-23T23:29:59+5:30
वाडा : तालुक्यातील पिंपरोळी येथील गट नंबर ६७ पैकी १/२ या जागेत मुंबईतील एका व्यक्तीने घर व संरक्षक भिंतीचे ...

वनेतर कामांस बंदी असलेल्या जागेत बांधकाम
वाडा : तालुक्यातील पिंपरोळी येथील गट नंबर ६७ पैकी १/२ या जागेत मुंबईतील एका व्यक्तीने घर व संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. हे क्षेत्र सेक्शन ३५मध्ये येत असून तेथे वनेतर कामांना बंदी आहे. त्यामुळे येथे बांधकाम झालेच कसे, असा प्रश्न मनसेचे तालुका सचिव देवेंद्र भानुशाली यांनी जव्हारच्या उपवनसंक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारींत केला आहे. या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परिमंडळ व वनपरिक्षेत्र स्तरावर दप्तरी अभिलेख असताना या जागेत बांधकाम झाले आहे. पश्चिम वाडाचे वनक्षेत्रपाल हिंमत सापळे यांनी यासंदर्भातील नोटीस संबंधितांना पाठविली आहे. मात्र, या नोटिसीवर संबंधित अधिकाऱ्याने सही-शिक्का न मारल्याने ही नोटीस केवळ फार्स आहे का, असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र भानुशाली यांनी तक्रारीत केली. यासंदर्भात कारवाईचे पत्र लवकरच देण्यात येईल, असे जव्हारचे उपवनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी सांगितले.