स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले

By Admin | Updated: September 13, 2016 01:54 IST2016-09-13T01:53:55+5:302016-09-13T01:54:43+5:30

बोर्डी अस्वाली रोडलगतच्या शेतात गुरु वारी गृह संकुलाच्या शौचालयातील मैला टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.

Consolidate the villagers for cleanliness | स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले

स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले

डहाणू/बोर्डी : बोर्डी अस्वाली रोडलगतच्या शेतात गुरु वारी गृह संकुलाच्या शौचालयातील मैला टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबून ग्रामपंचायतीकडे दाद मागितली. बोर्डी ग्रामपंचायतीने हस्तक्षेप केल्यानंतर शेतकऱ्याने मैल्याची विल्हेवाट लावण्याचे मान्य केल्याने स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
बोर्डी गावातील तारा अपार्टमेंट या रहिवासी संकुलातील शौचालयाच्या टाकीची स्वच्छता गुरुवारी करण्यात आली. त्यानंतर हेमंत भास्कर चुरी या ग्रामस्थाने हा मैला टँकरद्वारे अस्वाली रोडवरील भाटआळी येथील शेतात टाकला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांना त्रास होऊ लागला. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने भाटआळी येथील रहिवाशांनी सहयांची मोहीम राबवून सामूहिक निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने हेमंत चुरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या विरु द्ध ग्रामस्थांनी केलेली तक्रार मांडली. दरम्यान, तो मैला शेतीला सोनखत देण्याच्या उद्देशाने टाकला होता. मात्र परिसरात दुर्गंधी पसरल्याने येत्या सात दिवसांच्या आत मैलाची विल्हेवाट लावण्याची लिखित हमी हेमंत चुरी यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Consolidate the villagers for cleanliness