दाभाड जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST2021-07-18T04:28:31+5:302021-07-18T04:28:31+5:30

भिवंडी : तालुक्यातील कालवार येथे पाचगाव शांतता उन्नती मंडळ समाज हॉल येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचे शनिवारी आयोजन करण्यात ...

Congress worker from Dabhad Zilla Parishad group joins Shiv Sena | दाभाड जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

दाभाड जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश

भिवंडी : तालुक्यातील कालवार येथे पाचगाव शांतता उन्नती मंडळ समाज हॉल येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख विश्वास थळे, आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते देवानंद थळे, सभापती कुंदन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कलाताई शिंदे, युवासेना जिल्हाध्यक्ष प्रभुदास नाईक यांच्या विशेष उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.

दाभाड सोसायटीचे संचालक दत्तात्रेय हरी पाटील, उद्योगपती शरद घरत, प्रकाश शेळके, सोमनाथ पाटील, जयकाली जाधव, अमोल पाटील, काका पाटील, भावेश पाटील, आदी प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रणित युवासेना उपजिल्हाप्रमुख राजू चौधरी, उपतालुकाप्रमुख भरत शेलार, उपतालुकाप्रमुख हनुमान पाटील, शिवसेना कार्यकर्ते श्रीकांत गायकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी‌ शिवसेनेत प्रवेश केला‌ आहे. यावेळी दाभाड गटाचे विभागप्रमुख बाळकृष्ण जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक अंकुश पाटील, आदेश शेळके, दिलीप पाटील, संतोष पाटील, दयानंद घरत, सचिन राऊत, रघुनाथ पांढरे, प्रभाकर पाटील, संकेत पाटील, तुषार शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Congress worker from Dabhad Zilla Parishad group joins Shiv Sena