ठामपा निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेस घेणार फारकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:35 IST2020-09-24T23:34:42+5:302020-09-24T23:35:24+5:30
स्वबळाचा नारा : सर्व जागा लढण्याची तयारी

ठामपा निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेस घेणार फारकत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
येत्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र उमेदवार उभे करण्यात येणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच प्रत्येक प्रभागात लोकोपयोगी कार्यक्रम, नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाºयांच्या बैठकीत व्यक्त केले.
नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक मुंब्रा येथे आयोजिली होती. याप्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज शिंदे, अनिल साळवी, प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप, जे.बी. यादव, अनिस कुरेशी, महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस पक्ष बुथस्तरापासून मजबूत करणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपली कार्यकारिणी कार्यरत राहील, असे चव्हाण यांनी पदाधिकाºयांना मार्गदर्शन करताना सांगितले. मात्र, ठाणे शहरात तोळामासा ताकद असलेल्या आणि सध्या तीनच नगरसेवक असलेल्या काँगे्रसने राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीशी फारकत घेऊन आगामी महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच स्वबळाचा नारा दिल्याने साºयांच्याच भुवया उंचावल्या आहेत.