काँग्रेस पुन्हा फिनिक्स भरारी घेईल - दलवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 05:02 IST2016-10-07T05:02:58+5:302016-10-07T05:02:58+5:30
काँग्रेस पक्ष सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. देशात किंवा राज्यात पक्ष सत्तेत नाही,पण स्व.इंदिराजी आणि स्व. राजीवजी यांच्या बलिदानाची

काँग्रेस पुन्हा फिनिक्स भरारी घेईल - दलवाई
वसई : काँग्रेस पक्ष सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. देशात किंवा राज्यात पक्ष सत्तेत नाही,पण स्व.इंदिराजी आणि स्व. राजीवजी यांच्या बलिदानाची परंपरा लाभलेल्या या पक्षाचे जनतेच्या हृदयात अढळ स्थान आहे. त्यामुळे पुन्हा या फसव्या भाजप सरकारच्या भूलथापांना देशातील जनता बळी पडणार नाही आणि काँग्रेस पुन्हा फिनिक्स भरारी घेऊन सत्तेत येईल असा आशावाद खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. वसई काँग्रेस भवन येथे वसई विरार शहर जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदधिकाऱ्याच्या बैठकीत दलवाई बोलत होते.
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांनी आपल्या भाषणात, आपण जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून केलेल्या आढावा घेऊन अनेक पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असून लवकरच या सर्वांना सामावून घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.प्रदेश सरचिटणीस यशवंत हाप्पे,विश्वनाथ पाटील,प्रदेश सचिव बालकृष्ण पूर्णेकर,विजय पाटील, प्रकाश सोनावणे,दत्ता नर,विनय राणे,माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,स्वातंत्र्य सैनिक उद्धव घरत, वर्तक,शहर अध्यक्ष मायकल फुट्यार्डो, युवक अध्यक्ष पुष्कराज वर्तक , विल्यम फर्नांडिस,जिमी घोन्सालविस, ग्रामीण अध्यक्ष राम पाटील, राजू गवाणकर, गीता वेर्णेकर, महिला अध्यक्ष प्रवीणा चौधरी, रोहिणी कोचरेकर, सचिव किरण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नालासोपारा पूर्व भागातील युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच देवतलाव येथे गटार बांधण्यासाठी खासदार फंडातून निधी मिळावा यासाठी दलवाई यांचेकडे डॉमनिक डिमेलो आणि राम पाटील यांनी मागणी केली. सूत्रसंचालन स्टीव्हन क्रेस्टो यांनी केले. (प्रतिनिधी)