शहापूरमध्ये काँग्रेसचे बूथ बांधणी अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST2021-09-25T04:43:31+5:302021-09-25T04:43:31+5:30

शहापूर : काँग्रेसने मतदार संपर्क अंतर्गत बूथ बांधणी अभियान सुरू केले असून शहापूर तालुका काॅंग्रेस कमिटीच्या वतीने नुकताच ...

Congress starts booth construction campaign in Shahapur | शहापूरमध्ये काँग्रेसचे बूथ बांधणी अभियान सुरू

शहापूरमध्ये काँग्रेसचे बूथ बांधणी अभियान सुरू

शहापूर : काँग्रेसने मतदार संपर्क अंतर्गत बूथ बांधणी अभियान सुरू केले असून शहापूर तालुका काॅंग्रेस कमिटीच्या वतीने नुकताच येथील जनसंपर्क कार्यालयात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर तालुक्यातील काँग्रेसचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष गट अध्यक्ष यांची बैठक पार पडली. या बैठकीत मतदार संपर्क अभियान, बूथ बांधणी व आगामी निवडणुका यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे व तालुकाध्यक्ष महेश धानके यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत शहापूर शहराध्यक्षपदी सुनील पानमंदे, किन्हवली शहराध्यक्षपदी हारून शेख, तर चेरपोली गट अध्यक्षपदी गणेश विशे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस प्रदेश ओबीसी विभागाचे सरचिटणीस रवींद्र परटोले, महिला नेत्या अपर्णा खाडे, बदलापूर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित हाेते.

Web Title: Congress starts booth construction campaign in Shahapur