ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

By Admin | Updated: January 6, 2017 18:01 IST2017-01-06T18:01:04+5:302017-01-06T18:01:04+5:30

ठाणे शहर (जि.) काॅग्रेस कमिटीच्यावतीनेही आज जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य धडक मोर्चा काढून

Congress Stalker Front at Thane District Collectorate | ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

ऑनलाइन लोकमत
 ठाणे, दि. 6 -   केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या नोटबंदी विरोधात काँग्रेसच्यावतीने देशभरात  आंदोलन करण्यात येत आहे. ठाणे शहर (जि.) काॅग्रेस कमिटीच्यावतीनेही आज जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्यामुळे सतंप्त झालेल्या कार्यकर्त्यांसह नेत्यानी कार्यालयातच तासभर ठिय्या धरला. 
        ""मोदी सरकार हाय हाय"" भा.ज.पा.सरकार मुर्दाबाद "" आदी घोषना कार्यकर्ते देत होते. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला व भेटण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकार्याच्या कार्यालयातच तासभर ठिय्या आंदोलन केले.
 या प्रंसगी काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह नोटाबदी आंदोलनाचे प्रभारी व गुजरातचे आमदार अश्विन कोतवाल, प्रदेश सरचिटणीस व प्रभारी तारिक फारुकी,माजी खासदार आय्.जी. सनदि,प्रदेश काँग्रेस सचिव बाळकृष्ण पूर्णेकर व सजंय चौपाने, के.वृषाली,नगरसेवक यासिन कुरेशी,विक्रांत चव्हाण,प्रदिप राव,परिवहन समीती सदस्य सचिन शिंदे,महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,युवक काँग्रेसचे किशोर कांबळे,जगदिश गौरी,भरत पडवळ,सरचिटणीस विजय हिरे पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Congress Stalker Front at Thane District Collectorate