शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगमिरे या अधिका-याच्या विरोधात काँग्रेसचे सभात्याग; सर्वसाधारण सभेत उपस्थित राहत नसल्याने केला सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:56 IST

अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहून महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम पालिकेचे काही अधिकारी करीत असतात.

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहून महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम पालिकेचे काही अधिकारी करीत असतात. सर्वसाधारण सभेला सर्व अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र पालिकेच्या नगररचना विभागाचा पदभार सांभाळणारे संजय हिंगमिरे हे सतत सर्वसाधारण सभेला गैरहजर राहत असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला.अधिकारी सभागृहात उत्तर देण्यासाठी येत नसल्याने या अधिका-यांच्या गैरपद्धतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सभात्याग केला. अखेर हिंगमिरे यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याधिका-यांनी स्पष्ट केल्यावर पुन्हा सभा सुरू झाली.अंबरनाथ पालिकेची सोमवारची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सभा सुरू झाल्यावरच अधिका-यांच्या गैरहजेरीबाबत काँग्रेसने पालिका प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी ज्या दोन अधिका-यांवर आहे ते दोन्ही अधिकारी आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर होते. लोकशाही दिनासाठी जाणे गरजेचे असल्याने शहर अभियंते मनीष भांमरे आणि नगररचना विभागाचे काम पाहणारे अधिकारी संजय हिंगमिरे या दोघांना पाठविण्यात आले. मात्र हिंगमिरे हे सभेला उत्तर देण्यासाठी कधीच सभागृहात येत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. प्रत्येक वेळी काहींना काही कारणे देऊन सभेला गैरहजर राहणा-या अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदविण्यात आले.संबंधित अधिकारी दादागिरीची भाषा करित असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील केला. येवढेच नव्हे तर संबंधित अधिकारी हा पालिकेकडे आलेल्या तक्रारी बाहेरील व्यक्तींना सांगून भांडणे लावण्याचे काम करित असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपावर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी देखील शिक्कामोर्तब करीत हा अधिकारी भांडणे लावण्यात तरबेज असल्याचे मत व्यक्त केले. पालिकेची कामे कमी तर बांधकाम व्यवसायिकांची कामेच करण्यात हा अधिकारी व्यस्त असल्याने त्याला पदमुक्त करण्याची मागणी काँग्रेसने केली.मात्र प्रशासन या प्रकरणी ठोस उत्तर देत नसल्याने काँग्रेसने सभात्याग करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर उपनगराध्यक्ष वाळेकर, राष्ट्रवादीचे गटनेते सदाशिव पाटील यांनी काँग्रेस नगरसेवकांची समजूत घालून पुन्हा सभागृहात येण्याची मागणी केली. मात्र जोपर्यंत हिंगमिरे यांच्यावर ठोस कारवाई होत नाही तोवर सभागृहात येणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर मुख्याधिका-यांनी या वादग्रस्त अधिका-याला सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच त्याला पदमुक्त करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी सभागृहाने केली. या निर्णयानंतर पुन्हा सभा सुरू झाली.पालिकेच्या सभेला सुरुवात झाल्यावर नगरसेवक संदीप लोटे यांच्या विरोधात स्वच्छता निरीक्षकाने पालिकेचे मुख्याधिकारी यांची परवानगी न घेता परस्पर गुन्हा कसा दाखल केला याचा जाब विचारला.तसेच गुन्हा दाखल करतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केल्याने नगरसेवक स्वच्छता निरीक्षक पुंडलिक शेकटे यांच्या निलंबनाची मागणी करीत होते. यावर निलंबन करता येणार नसले तरी त्यांची विभागीय चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. याच मुद्याला अनुसरुन काँग्रेस नगरसेवक आणि भाजपा नगरसेवकांनी पालिकेतील स्वच्छता निरिक्षकांच्या पदव्या तपासण्याची मागणी उचलुन धरली. अनेकांच्या पदव्या ह्या बेकायदेशिर असल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावर मुख्याधिका-यांनी सर्व स्वच्छता निरिक्षकांच्या पदवी तपासुन योग्य ती कायदेशिर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

काँक्रिटच्या निविदा केले रद्द अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे ही 10 ते 14 टक्के कमी दराची असल्याने या रस्त्यांच्या कामाचा दर्जा योग्य राखणो शक्य नसल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. सोबत जीएसटीचे दर आणि नवीन डीएसआरचे दर या निविदांना नसल्याने नव्या डीएसआर दराने या निविदा काढण्याची सुचना नगरसेवक अब्दुल शेख यांनी केली. या सुचनेला सदाशिव पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे शहरातील काँक्रि टच्या रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे झाला आहे.भाजपा - काँग्रेसमध्ये शाब्दिक वादावादीने सभागृह तंगपालिकेतील विकास आराखडय़ातील रस्त्यांचे आरेखन करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यावरुन काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील आणि भाजपाचे नगरसेवक भरत फुलोरे यांच्यात वादावादी झाली. अधिकारी सभागृहात येत नसल्यानेच आपल्याला उत्तर मिळत नसल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तर फुलोरे यांनी काँग्रेसच्या सांगण्यानुसार आम्ही सर्व काही करणार नाही असा आक्षेप नोंदविला. या वादावातीत फुलोरे यांनी पाटील यांना आपली कामांमध्ये हिस्सेदारी आहे असा आरोप केल्यावर काँग्रेस नगरसेवकांनी फुलोरे यांना चांगलेचे धारेवर धरले. वैयक्तीक आरोप कसे केला असा जाब काँग्रेस नगरसेवकांनी विचारला. यावेळी सभागृहातील तंग झालेले वातावरण पाहता काँग्रेस नगरसेवकांना आवारण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवकांनी केला. वातावरण जास्त तंग होऊ नये यासाठी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी सर्व विषय मंजूर करून ही सभा गुंडाळली.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस