शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:48 IST

देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.

ठाणे - देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी प्रकाशाच्या मार्गातून भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले.राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी (कवाडे गट) आणि समाजवादी पार्टी या आघाडीच्या कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार सभेत ते बोलत होते. मध्यंतरी भारताने सहा बॉलमध्ये १८ रन बनवले. त्यावेळी शेवटच्या बॉलवर षटकार खेचून जसा भारताचा विजय झाला. त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांनी शेवटच्या बॉलवर नाही, तर एक बॉल राखून विजयी षटकार मारावा. जिल्ह्यातील आघाडीचे असलेले वैभव आपल्याच चुकांमुळे गेले आहे. त्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. आता, कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीतून आघाडीचा उमेदवार मुल्ला यांचा विजय हा भविष्यातील लोकसभेपाठोपाठ असलेल्या विधानसभेसाठी प्रकाशमार्ग ठरणार आहे.तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे जिल्ह्यात चारही खासदार निवडून येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.काँग्रेस इच्छुक होतीकोकण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष इच्छुक होता. त्यासाठी आपण प्रयत्न केले. पण, नजीब उभा राहत असल्याने आपण माघार घेतली, असे मत काँग्रेसचे ठामपा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवले.गद्दारांना धडा शिकवेल - जितेंद्र आव्हाड२०१९ मध्ये सत्तापरिवर्तन होईल. याचे चित्र आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत दिसत आहे. तसेच मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नसते. तसेच हे राज्य गद्दारांना धडा शिकवणारे आहे. गेल्या काही दिवसांत देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अंसतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच, मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा करून विकासाचा मुद्दा हे सरकार बाजूला करत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यशवंत हाप्पे, माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, महेंद्र पवार, असलम खान, माजी महापौर मनोहर साळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस