काँग्रेस-राष्ट्रवादी में दोस्तीभरी लढाई?
By Admin | Updated: February 6, 2017 04:24 IST2017-02-06T04:24:56+5:302017-02-06T04:24:56+5:30
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने येथे राष्ट्रवादीने आपली दादागिरी दाखवून त्या परिसरात मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला आघाडी करताना मांडला होता

काँग्रेस-राष्ट्रवादी में दोस्तीभरी लढाई?
ठाणे : कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने येथे राष्ट्रवादीने आपली दादागिरी दाखवून त्या परिसरात मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला आघाडी करताना मांडला होता. पण, शेवटपर्यंत त्यावर आघाडीचे चित्र स्पष्ट न झाल्याने दोन्ही पक्षांनी आमनेसामने उमेदवार दिले आहेत. त्यातच, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते अट्टहासाला पेटल्याने अखेर कळवा खाडी के उस पार मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कित्ता यंदा गिरवला जाणार असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. शिवसेना आणि बीजेपीच्या युतीबाबत सुरुवातीपासून दोन्ही पक्षांची नकारात्मक भूमिका असल्याने या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. याचदरम्यान, आघाडीबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मुंबईतील नेते मंडळी सुरु वातीपासून सकारात्मक होती. त्यानंतर, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठाण्यात आल्यावर आघाडीचे संकेत दिले होते. मात्र, दुसरीकडे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी काही जागांवरून तेढ निर्माण करून आघाडीचे चित्र शेवटपर्यंत स्पष्ट होऊ दिले नाही. तिकीटवाटपाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी आमनेसामने उमेदवार दिले. हा वाद पुन्हा वरिष्ठांकडे गेला. आघाडीत बिघाडी टाळण्यासाठी ‘कळवा खाडी के उस पार दोस्तीभरी लढाई होगी आरपार’ अन् शहरात आघाडीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)