शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
5
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
6
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
7
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
8
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
9
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
10
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
11
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
12
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
13
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
14
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
15
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
16
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
17
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
18
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
19
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
20
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट

मल:निसारण प्रक्रिया केंद्र बंद प्रकरणी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

By धीरज परब | Updated: November 29, 2022 14:14 IST

पालिका अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात असल्याने अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे.

- धीरज परब मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने तब्बल ७०० कोटीं पेक्षा जास्त खर्चून केलेल्या भूमिगत गटार योजनेतील केवळ दोन मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प ५० टक्के क्षमतेनेच सुरु असून बाकी केंद्र बंद वा अपूर्ण आहेत. पालिका अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात असल्याने अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मीरा-भाईंदरकाँग्रेस तर्फे सातत्याने महापालिकेच्या मलनिःस्सारण केंद्राच्या घोटाळ्यांच्या पुराव्यांसह तक्रारी केल्या आहेत . पालिका व एमपीसीबी च्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा दोन्ही विभागाचे अधिकारी नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी खेळ करत आहेत . मलमूत्राचे घातक सांडपाणी हे प्रक्रिया न करताच थेट खाडी , समुद्रात व कांदळवन क्षेत्रात तसेच नाल्यात सोडले जात आहे .  एमपीसीबी प्रदूषण व पर्यावरचा नाश करू देत असताना दुसरीकडे तक्रारी नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारांसह मलनिःस्सारण केंद्रांची पाहणी केली.

जैसल पार्क आणि सृष्टी येथील मल:निसारण प्रक्रिया केंद्र पूर्णतः बंद तर नाझरथ चर्च, खारीगाव येथील केंद्रे अपूर्ण बांधकाम व अपुऱ्या यंत्रसामुग्री मुळे बंद आहेत. सृष्टि म्हाडा येथील केंद्र  रहिवाशी्यांच्या विरोधा मुळे बंद आहेत तर शांतिपार्क, नयानगर येथील केंद्रे क्षमतेच्या निम्म्या क्षमतेने  सुरु आहेत. उर्वरित ४ मलनिःस्सारण केंद्र प्रक्रियेविना दिखाव्यासाठी कार्यरत ठेवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पाहणी नंतर जिल्हाध्यक्ष सामंत यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या नंतरही त्यांनी कारवाई केली नाही.  पालिकेचे संबंधित विद्यमान आणि तत्कालीन अधिकारी तसेच एमपीसीबीचे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने करोडोंचा खर्च केला गेला .  नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकून खाडी - समुद्र मधील पाणी प्रदूषित केले , पर्यावरचा नाश केला , मासे आदी जलजीव नष्ट केले असल्याने ह्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी  सामंत ह्यांनी केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcongressकाँग्रेस