शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत काँग्रेसची गळती सुरूच; काँग्रेसचे मनपा गटनेते हलीम अन्सारी यांचा राष्ट्रवादीत प्रेवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:49 IST

यावेळी अन्सारी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा हलीम अन्सारी यांनीदेखील राष्ट्र्वादीत प्रवेश केला त्याच बरोबर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते सगीर खान, शफिक शेख यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भिवंडी - भिवंडी काँग्रेसमधील बंडखोरी अजूनही सुरूच आहे. काँग्रेसचे महापालिका गटनेते हलीम अंसारी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू ,उपमहापौर इम्रान खान उपस्थित होते. 

यावेळी अन्सारी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा हलीम अन्सारी यांनीदेखील राष्ट्र्वादीत प्रवेश केला त्याच बरोबर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते सगीर खान, शफिक शेख यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. नुकताच झालेल्या भिवंडी पालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारासाठी पक्षादेश बजावण्याचे आदेश देऊन ही त्याची अंमलबजावणी न केल्याने काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांची गटनेते व काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांनी केली असता ती हकालपट्टी होण्या पूर्वीच हलीम अन्सारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

पालिकेत बहुमत असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या गटनेता पदाची जबाबदारी हलीम अन्सारी यांच्यावर दिली होती , परंतु त्यांनी विश्वासघात केल्याने महापौर पदाच्या निवडणुकीबरोबरच नुकताच झालेल्या स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला या सर्व घटनांमागचा खरा चेहरा गटनेता हलीम अन्सारी हेच असल्याचे त्यांच्या पक्ष प्रवेशाने उघड झाले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे .खुद्द गटनेत्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची बंडखोरी पुन्हा समोर अली असून  शहरात काँग्रेस पक्षाची पुरता वाताहत होत चालली असून पाच वर्षांपूर्वी मनपात एकही नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीची नगरसेवक संख्या २० वर पोहचली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरात मजबूत होत आहे तर दुसरीकडे काँग्रेसची वाताहत होतानाचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.   

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार