शहरं
Join us  
Trending Stories
1
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
2
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
3
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
4
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
5
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
6
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
7
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
8
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
9
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
10
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
11
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
12
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
13
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
14
बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
15
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद
16
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
17
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
19
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
20
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन

देशाला अडचणीत आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न- सुधांशू त्रिवेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:32 IST

नागरिकता सुधारणा कायदा हा मूळ काँग्रेसने आणलेला आहे.

ठाणे : नागरिकता सुधारणा कायदा हा मूळ काँग्रेसने आणलेला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी आणि काँग्रेस समितीने आग्रह धरलेल्या या कायद्याला मोदी सरकार प्रत्यक्षात उतरवत असतानादेखील केवळ सत्तेपासून वंचित असलेल्या काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे, हे स्पष्ट दिसत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी केली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.नागरिकता सुधारणा कायद्यावर मत मांडताना सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले की, धर्माच्या नावावर जो देश जन्माला आला, त्याचे धर्मबांधवांनीच दोन तुकडे केले. मात्र, भारत असा देश आहे, त्यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्यांचा विकास झाला. मात्र, काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या मुस्लिम समाजाला काँग्रेसने सतत भीतीच्या सावटाखाली ठेवले. त्यांना मदरशात टाकले. स्वतंत्र कायदा करून त्यांना देशात मिसळू दिले नाही. फतव्यात अडकवले. मुस्लिमांमधील कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडिअर उस्मान यांना हीरो करू दिले नाही, तर मुस्लिम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले. मतांसाठी देश तोडत राहिले आणि आता संपूर्ण देशात तोडफोड करीत आहेत. देशात कोण शरणार्थी आणि कोण घुसखोर आहेत, हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रनीती म्हणून नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणारच, असा विश्वास त्रिवेदी यांनी व्यक्त केला.ज्यांना कालपर्यंत परराज्यांतील भारतीयदेखील नको होते, ते सत्तेच्या मोहापायी घुसखोरांची तळी उचलत आहेत, असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टीका केली. एनआरसी अद्याप आला नसला तरी, जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल, असे म्हणून काही लोक ऊर बडवत असल्याचा टोला त्रिवेदी यांनी लगावला.हा कायदा देशाला नवीन आयाम देणारा ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे होते. यावेळी म्हाळगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते.>शेरोशायरीही पाकिस्तानीअब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडिअर उस्मान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय. त्यांना याकुब मेमन, अफजल गुरू आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथींच्या विचाराला बळ देऊन आधी देश तोडणाऱ्या आणि आता देशात तोडफोड करणाºया काँग्रेसची शेरोशायरीदेखील आता पाकिस्तानी झाली असल्याची टीका सुधांशू त्रिवेदी यांनी या वेळी केली.