शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

अदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 6:44 AM

वीज दरवाढीचा निषेध : कुंड्या, शेडची केली तोडफोड

भाईंदर : शहराला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटीने वीजदरात भरमसाट वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने शनिवारी भार्इंदर येथील कार्यालयावर हल्लाबोल केला. यात कंपनीच्या फलकासह झाडांच्या कुंड्यांची व बांबूच्या शेडची तोडफोड करण्यात आली.

देशात महागाई वाढत असताना विजेचे दर ग्राहकांना विश्वासात न घेता भरमसाठ वाढविल्याने अदानी ही कंपनी देशाचा चौकीदार असलेल्या चोराच्या भागीदारीत सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केला. नागरिकांच्या खिशातील पैसा रिलायन्स, अदानींसारख्या उद्योगपतींच्या कर्ज फेडीसाठी वापरला जात असून हे सरकार या उद्योगांच्या दावणाला बांधलेले दरोडेखोर असल्याचा घणाघात त्यांनी केला.पूर्वी सामान्य ग्राहकाला १५० रूपये बिल महिन्याला येत होते. येत्या १५ दिवसांत अदानी कंपनीने ग्राहकांच्या माथी मारलेली वीज दरवाढ मागे घेतली नाही तर १ जानेवारीपासून काँग्रेस असहकार आंदोलन छेडून नागरिकांनी वीज बिल भरू नये, असे आवाहन करणार आहे. बिल थकल्यास अदानी कंपनीचे अधिकारी वीज खंडित करण्यासाठी आल्यास त्यांना नागरिकांनी चोप द्यावा, असे त्यांनी सांगून टाकले.जोपर्यंत वीज दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या विरोधात कुणी बोलल्यास त्याच्यावर सरकारी कारवाईचा बडगा उचलला जातो. केंद्रात मोठा चौकीदार तर राज्यात छोटा चौकीदार बसल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शहरात नियोजित असलेल्या मेट्रोचे भूमिपूजन शहरात नव्हे तर कल्याणला केले जात असल्याची टीका त्यांनी केली. या मेट्रोला प्रत्यक्षात विलासराव देशमुख व पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला. त्याचे भूमिपूजन भाजपा करत असली तरी ती सुरू मात्र काँग्रेसच करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.भाषण सुरू असताना त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अदानीच्या कार्यालयात जाण्याचे निर्देश देताच कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्लाबोल करत तेथील वस्तूंची तोडफोड केली. दरम्यान, कंपनीचे विभागीय प्रमुख तथा उपाध्यक्ष राजीव नखरे यांनी हुसेन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले. या चर्चेत कंपनीच्या वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्वासन अधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले.आंदोलनात पक्षाचे कोकण विभागाचे निरीक्षक संदीप कुमार, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, महिला जिल्हाध्यक्ष लीला पाटील, गटनेता जुबेर इनामदार, अश्रफ शेख, राजीव मेहरा, नरेश पाटील, नगरसेविका उमा सपार, गीता परदेशी, प्रवक्ता अंकुश मालुसरे आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :thaneठाणे